वाशिम - जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक सदस्यीय केंद्रीय पथक वाशिम जिल्ह्यात दाखल झाले आहे. पुढील तीन दिवस हे पथक वाशिम जिल्ह्यात ठिक-ठिकाणी भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे.
सदस्यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा
वाशिम जिल्ह्यासाठी गठीत करण्यात आलेल्या दोन सदस्यांपैकी एक सदस्य डॉ. पुनीत अरोरा हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर दुसरे सदस्य डॉ. कार्तिक बालाजी हे शुक्रवारी दाखल होतील. आज या केंद्रीय पथकातील एक सदस्य डॉ. पुनीत अरोरा यांनी कारंजा शहरातील विविध भागात जाऊन कंटेन्मेंट झोन, कोविड हॉस्पिटल सह कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर त्यांनी कंटेन्मेंट झोन परिसरातील नागरिकांची विचारपूस केली आहे. या पथकासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर व तहसीलदार धीरज मांजरे होते उपस्थित होते.
हेही वाचा - रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवा, एप्रिल अखेर दिवसाला दीड लाख इंजेक्शन लागण्याची शक्यता - राजेश टोपे