वाशिम - शहरातील समशानभूमी जवळ असलेल्या महादेव संस्थान पद्मतीर्थ तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धोन्डु ज्ञानबा चव्हाण (२३, रा. जांभरुन नावजी) असे या मृत झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, नगर परिषदेच्या बचाव पथकाला पाचारण करून त्यांच्या सहकार्याने काही वेळेच्या शोध मोहीमेनंतर धोन्डु याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. तर, वाशिम शहर पोलीस पुढील तपास करत आहे.