ETV Bharat / state

वाशिममध्ये 5 लाख 90 हजारांचे बोगस बियाणे जप्त, दुकानदार फरार - कपाशीचे बोगस बियाणे जप्त

वाशिममध्ये कपाशीच्या बोगस बियाणांच्या साठ्यावर कृषी विभागाने धाड टाकली. यात 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संदीप दादाराव थेर असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो फरार आहे.

washim
वाशिम
author img

By

Published : Jun 1, 2021, 8:10 PM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील धानोरा (घाडगे) येथे कपाशीच्या बोगस बीटी बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, कृषी विभागाच्या चमूने धाड टाकली. यात 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आरोपी संदीप दादाराव थेर याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बोगस बियाणांच्या साठ्यावर धाड

पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एस. मकासरे यांच्या तक्रारीनुसार, धानोरा बु.(घाडगे) येथे बोगस बीटी बियाणे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर घराची झडती घेतली असता एकूण 10 कट्टे आढळून आले. त्यापैकी 9 कट्टे सीलबंद व एक कट्टा खुला होता. त्यामध्ये 492 कापूस बियाणे पाकिटे व कल्याण 111 संशोधित असे लिहिलेली पाकिटे आढळून आली. यातील प्रत्येक पाकिटावर 1200 रुपये किंमत होती. तर त्याचे वजन 450 ग्रॅम असल्याचे आढळून आले. एकूण 492 पाकिटे जप्त करण्यात आली. याची किंमत 5 लाख 90 हजार 400 रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. ही बोगस बियाणांची पाकिटे नंदुरबार येथून आरोपीने आणल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपी फरार, बियाणे जप्त

पोलीस स्थानकात बोगस बियाणे ठेवण्यात आली आहेत. धाडसत्रादरम्यान आरोपी संदीप थेर फरार झाला आहे. त्याच्याविरुद्ध विनापरवाना बियाने साठवणे व विक्री करणे, तसेच 420 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिगांबर मकासरे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के, ठाणेदार शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मदन पुनेवार, महादेव पायघन, पार्वती लडके, पोलीस पाटील अमोल हागे यांनी केली आहे.

हेही वाचा - नात्याला काळिमा.. रात्री अंगणात झोपलेल्या वहिनीला फरफटत नेत दिराचा बलात्कार, केज येथील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.