वाशिम- जिल्ह्यातील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावर ट्रक पलटी होऊन २ जण ठार तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी 9.45 च्या सुमारास घडली. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
अमरावतीला सेंट्रिंगचे काम करण्यासाठी मनोरा तालुक्यातील इंझोरी येथील १० मजूर ट्रकने जात होते. दरम्यान शाहा फाट्यालागत असलेल्या हनुमान मंदिरा नजीक रस्त्यावरील खड्डे चुकविताना चालकाचे ट्रकवरील (क्र.एम.एच ०४, इ.वाय.३२३१) नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. या घटनेत ट्रकमध्ये सवार मारोती गोरे व नाना कांबळे हे दोघे ठार झाले असून इतर ८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, कारंजा-मूर्तिजापूर मार्गावर मोठ-मोठे जीवघेणे खड्डे पडल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, संबंधित विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा- रस्ते खराब झाल्याने दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतातच