ETV Bharat / state

प्रेरणादायक! वय 101, स्कोर 12 तरी केवळ दहा दिवसात आजीबाईंची कोरोनावर मात - 101 वर्षाच्या म्हातारीची कोरोनावर मात

एक आजीबाई ज्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि कानांनी ऐकू येत नाही. वय वर्ष 101 आणि HRCTचा स्कोर 12. असं असूनही या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या मनात कोरोनाबद्दल भीती नसल्याने त्या सहज बऱ्या झाल्या. त्यांना साधं ऑक्सिजन देखील लावावं लागलं नाही. या आजीबाईंवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

101 year old lady recovered from corona in washim district
आजीबाईंची कोरोनावर मात
author img

By

Published : May 27, 2021, 9:04 AM IST

वाशिम - संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेने तर हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक वृद्धांनी कोरोनावर मात केल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. अशाच एका आजीबाईंनी कोरोनावर जिद्दीने मात केली, याबदद्ल माहिती देणारी ही बातमी. एक आजीबाई ज्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि कानांनी ऐकू येत नाही. वय वर्ष 101 आणि HRCTचा स्कोर 12. असं असूनही या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या मनात कोरोनाबद्दल भीती नसल्याने त्या सहज बऱ्या झाल्या. त्यांना साधं ऑक्सिजन देखील लावावं लागलं नाही. या आजीबाईंवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

१०१ वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात..

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील जयवंताबाई गंगाराम रंजवे या 101 वर्षांच्या आजीला कोरोनाची लागण झाली होती. कुटुंबातील सदस्यांनी आजींना कवठा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
तिथे कार्यरत डॉक्टर आणि परिचारीकांनी आजीवर कोरोनाचे उपचार सुरू केले. आजीने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत 10 दिवसातच कोरोनावर मात केली. जयवंताबाई रंजवे यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. तसेच कानाने ऐकूही सुद्धा येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांचा स्कोर 12 होता तर ऑक्सीजनची पातळी 87 एवढी खाली आली होती. मात्र डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि कुटुंबाच्या मानसिक आधाराच्या बळावर तिने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर सेनगाव तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच उपचार केले गेले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.