ETV Bharat / state

'...तर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर उपोषण करू' - वर्धा शेतकऱ्यांचे नुकसान न्यूज

यंदा शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यात केवळ एकाच बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. काही ठिकाणी लागवड करण्यात आलेले सोयाबीन उगवले नाही. तर, काही ठिकाणी मोठ्या शेंगा भरल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

वर्धा युवा परिवर्तन आवाज संघटना न्यूज
वर्धा युवा परिवर्तन आवाज संघटना न्यूज
author img

By

Published : Oct 7, 2020, 6:31 PM IST

Updated : Oct 7, 2020, 7:04 PM IST

वर्धा - युवा परिवर्तन आवाज संघटनेतर्फे कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी अधीक्षकांना बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यापूर्वी दोनदा निवेदन देऊनही दखल घेण्यात आली नाही. यात बुधवारी कृषी अधीक्षक कार्यालयातील उपास्थित कर्मचारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बोलण्यातून वाद झाल्याने वातावरण तापले होते. यात खुर्च्यांची फेकाफेक करत कार्यलयाला कुलूप ठोकण्यात आले.

यंदा शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यात केवळ एकाच बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. काही ठिकाणी लागवड करण्यात आलेले सोयाबीन उगवले नाही. तर, काही ठिकाणी मोठ्या शेंगा भरल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

...तर आम्ही कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर उपोषण करू

हेही वाचा - नियम मोडणाऱ्यांना कराड पोलिसांचा दणका; महिन्यात २८ लाखांचा दंड वसूल

या संदर्भात युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेने दोन वेळा निवेदन देण्यात आले. पण 540 प्रकरणात बियाणे दोषी आढळले असताना कारवाई करण्यात आली नाही. जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले नसल्याचे सांगत तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते गेले असता कार्यालयात असणाऱ्या अजय राऊत या अधिकाऱ्याने उर्मट उत्तरे दिल्याने आणि चर्चा न केल्याने वातावरण तापले. 14 दिवस लोटूनही प्रकरण न्यायालयात दाखल न झाल्याने कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बाहेर निघत खुर्च्यांची फेकाफेक केली. यानंतर कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकून निषेध नोंदवण्यात आला.

लवकरात लवकर पाऊल उचलत कारवाई न केल्यास कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा युवा परिवर्तन आवाज संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांनी केला आहे.

रामनगर पोलिसांना माहिती मिळताच या प्रकरणात निहाल पांडे आणि त्यांचे समर्थकांना ताब्यात घेत कार्यालयाचे कुलूप उघडले. यात कृषी विभागाच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती रामनगर पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी ईटीव्ही भारतला दिली.

हेही वाचा - पुण्यात साउंड इलेक्ट्रिकल्स असोसिएशनचा मूक मोर्चा, इव्हेंट्सवरील बंदीबाबत संताप

Last Updated : Oct 7, 2020, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.