ETV Bharat / state

चालत्या रेल्वेतून उतरण्याच्या नादात युवकाचा पडून जागीच मृत्यू

गाडी चुकल्याचे कळल्यानंतर तुळजापूरजवळ गाडी हळू होणार म्हणून त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

तुळजापूर येथे चालत्या रेल्वेतून उतरण्याचा नादात युवकाचा मृत्यू १
author img

By

Published : May 18, 2019, 10:34 PM IST

वर्धा - तरुणाला अमरावतीला जायचे होते. परंतु, अमरावतीकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसायचे सोडून तो मुंबई-हावडा-शालिमार एक्स्प्रेसमध्ये बसला. गाडी चुकल्याचे कळल्यानंतर तुळजापूरजवळ गाडी हळू होणार म्हणून त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. गजानन डोंगरे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

तुळजापूर येथे चालत्या रेल्वेतून उतरण्याचा नादात युवकाचा मृत्यू

गजानन डोंगरे मुळचा अमरावती जिल्ह्यातील वलगावचा रहिवासी आहे. गजानन हा वर्धेला नातलागला भेटायला आला होता. वर्धा रेल्वे स्थानकावरुन घाई घाईत अमरावती जाण्यासाठी निघाला. मात्र, तो चुकून नागपूरकडे जाणाऱ्या गाडीत बसला. तुळजापूरजवळ त्याला आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आले. रेल्वेची गती कमी होणार याचा अंदाज आला म्हणून त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एवढ्यात तो खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

रेल्वेतून प्रवासी पडल्याचे लक्षात येताच गार्डने रेल्वे थांबत कंट्रोलरुमला माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

Intro:mh_war_ralwe accident_vis1_7204321

गाडी चुकली आणि तरुण जिवालाच मुकला

- तुळजापूर जवळील घटना
- धावत्या रेल्वेतू पडून तरुणांचा मृत्यू

वर्धा - अमरावतीकडे जायसाठी निघालेला तरुणांला अमरावतीला जायचे होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसायचा इथेच चूक झाली. तो मुंबई हावडा शालिमार एक्स्प्रेसमध्ये बसला. एवढ्यातच गाडी चुकल्याचे कळले. तुळजापूरला गाडी हळू होणार म्हणून उतरण्याचा प्रयत्न आणि जीवाला मुकला. गजानन डोंगरे असं या युवकाचे नाव आहे.

गगजानन डोंगरे मुळचा अमरावती जिल्ह्यातील वलगावचा रहिवासी होता. गजानन हा वर्धेला आपल्या नातलागला भेटायला आला होता. वर्धा रेल्वे स्थानकावरून घाई घाईत अमरावती जाण्यासाठी निघाला मात्र तो चुकून नागपूरकडे जाणाऱ्या गाडीत बसला. तुळजापूर नजीक त्याला आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आले. रेल्वेची गती कमी होणार याचा अंदाज होता. त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढ्यात तो खाली कोसळला. त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

रेल्वेतुन प्रवासी पडल्याचे लक्षात येताच गार्डने रेल्वे थांबत कंट्रोलरुमला माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.