अमरावती - वर्धा जिल्हात एका शिक्षिकेला भर चौकात जिवंत जाळन्याचा प्रयत्न करण्यात आला. हे प्रकरण हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती आहे. याची राज्य सरकारने दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करणार अशी प्रतिक्रीया महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यातील हिंगणघाटमधील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपुरातील खासगी रुगणालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.