ETV Bharat / state

बचत गटातील महिलांना उमेदच्या मदतीने जीवनोन्नती, बॅगची परदेशात विक्रीला सुरवात

वर्ध्यातील सिंदी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झालेल्या या व्यवसायाला जागतिक बाजारपेठ मिळू लागली आहे. इथे निर्मित होणाऱ्या खादीच्या हँड बॅग जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवू पाहत आहे.

खादी बॅग
author img

By

Published : Mar 8, 2019, 11:11 PM IST

वर्धा - घरातली आर्थिक परिस्थिती बेताची असताना शिवणकामाच्या आवडीतून खादी बॅग निर्मितीला सुरुवात झाली. वर्ध्यातील सिंदी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झालेल्या या व्यवसायाला जागतिक बाजारपेठ मिळू लागली आहे. इथे निर्मित होणाऱ्या खादीच्या हँड बॅग जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवू पाहत आहे. जागतिक महिला दिनी त्यांची ही विशेष बातमी.

संबंधित व्हिडीओ

संगीता गायकवाड यांनी २००९ मध्ये बॅग बनविण्याचे काम बचत गटाच्या माध्यमातून सुरू केले. ७ महिला एकत्र येत 'खादी' पासून डिजायनर हँडबॅग निर्मितीला सुरूवात केली. यासाठी त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद प्रकल्पाची साथ सार्थकी लाभली. ३ हजाराचा कच्चा माल घेऊन काम सुरू केले. यातून पहिली ऑर्डर २०० बॅग बनविण्याची मिळाली.

पहिली ऑर्डर अनुभव देत आत्मविश्वास वाढवणारी

पहिला ऑर्डर हिंदी विश्व विद्यालयातील २०० बॅग बॅनविण्याचा मिळाला. पहिला अनुभव चुका सुधारत खूप काही शिकवून गेला. पैसे जवळ नसताना उधारीत कच्चा माल घेऊन काम केले. महिन्याभरात दिवस रात्र काम करत ऑर्डर पूर्ण झाली. या ऑर्डरमुळे काम करण्याचा आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल आज वर्षाला पाच लाखांच्या घरात पोहचली. यातूनच संगीता गायकवाड यांना परदेश वारी घडली.

संगीता गायकवाड यांना या कामात साथ लाभली ती करिश्मा फटींग, उषा पांडे, प्रिया धपके, गीता पटले, वनिता आधुलकर, संगीता शेंदरे यांची. संगीता यांच्या काम आणि जिद्द आणि नेतृत्व कौशल्यामुळे महिलांनी त्यांची वर्धिनीच्या अध्यक्षा म्हणून निवड केली.

परदेश वारीतून जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल

धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झालेला वर्धिनी हा महाराष्ट्रातील एकमेव संघ आहे. वर्षाला पाच लाखाची उलाढाल होत असल्याने त्यांना महाराष्ट्र साधनांच्या उमेद प्रकल्प आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सॅनफ्रान्सिस्को, न्यूयॉर्क, बोस्टन या शहरात जाऊन जागतिक बाजारपेठ आणि त्याच्या कसोट्या शिकायला मिळाल्या. फेसबुक आणि गुगलला भेट देण्याची संधी मिळाली. तिथल्या उद्योजकांना भेटून ऑनलाइन बाजरपेठ विक्री आणि ऑर्डर मिळाली. जीवनोन्नतीचे फेसबुक अकाऊंट इथेच उघडले. त्या माध्यमातून त्यांना आता ऑर्डर मिळत असल्याचेही त्या सांगतात. सुरूवातीला बाजारात गेल्यावर साड्यांवर नजर जायची. आता मात्र, नजर जाते ती वेगवेगळे रंग आणि बनावट असलेल्या बॅगांवर. हळू-हळू कामाचा उत्तम दर्जा गाठण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रिया धपके आणि करिश्मा फटिंग सांगतात.वर्ध्यातील छोट्याशा सिंधी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीतील व्यवसाय उंच भरारी घेऊ लागला. महिलांनी स्वप्न पहावे आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे संगीता गायकवाड सांगतात.

Intro:R_MH_8_MARCH_WARDHA_WARDHINI_SPL_STORY_VIS_1

1 ते 5 व्हिजवल फाईल FTP केल्या आहेत. बाईट आणि पिटीसी फाईल इथे जोडत आहे.

5 नं. व्हिजवल फाईल मध्ये बचत गटातील संगीता गायलवड या परदेश दौरा पंकजा मुंडे यांच्या सोबत गेल्या होत्या त्याचे फोटोस आहे.

बचत गटातील महिलांना उमेदच्या मदतीने जीवनोन्नती, बॅगची परदेशात विक्रीला सुरवात

घरातली जेमतेम आर्थिक परिस्थिती असतांना शिवनकामच्या आवडीतून खादी बॅग निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली. वर्ध्यातील सिंदी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीत सुरु झालेला व्यवसायाला जागतिक बाजारपेठ मिळू लागली आहे. इथे निर्मित होणाऱ्या हँड बॅग खादीच्या हँड बॅग जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवू पाहत आहे. जागतिक महिला दिन त्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊ या....

वर्ध्यातील सिंदी मेघे येथील संगीता गायकवाड यांनी घरातील जेमतेम परिस्थितीला बद्दलविण्याचा मानस डोळ्यांसमोर ठेवून शिवनकामच्या आवडीला व्यवस्याच रूप द्यायला सुरवात केली. 2009 मध्ये बॅग बनविण्याचे काम बचतगटाच्या माध्यमातून सुरू केले. 7 महिला एकत्र येत 'खादी' पासून डिजायनर हँडबॅग निर्मितीला सुरवात केली. याला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद प्रकल्पाची साथ सार्थकी लाभली. काम सुरू झाले. तीन हजाराचा कच्चा माल घेऊन काम केले. यातून पहिली ऑर्डर 200 बॅग बनविण्याची मिळाली.

पहिली ऑर्डर अनुभव देत आत्मविश्वास वाढवणारी.........
परिस्थिती हलाकीची असतांना पहिला ऑर्डर मिळाला हिंदी विश्व विद्यालयातील 200 बॅग बॅनविण्याचा. पहिला अनुभव चुका सुधारत खूप काही शिकवून गेला. एक रुपया जवळ नसतांना उधारीत कच्चा माल घेऊन काम केले. महिन्याभरात दिवस रात्र काम करत ऑर्डर पूर्ण झाली. येथून काम करण्याचा मोठी उलाढाल करण्याचा आत्मविश्वास मिळाला. जे काम पहिल्या मोठ्या ऑर्डर पासून सुरू त्यांनतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आज ही उलाढाल वर्षाला पाच लाखाचा घरात पोहचली.यातूनच संगीता गायकवाड यांना परदेश वारी घडली.

संगीता गायकवाड याचे काम दिवसा मागे दिवस जात बचत गटाच्या नावाप्रमाणे उन्नतीकडे पाऊले टाकू लागले. याला साथ लाभली ती करिश्मा फटींफ, उषा पांडे, प्रिया धपके,गीता पटले, वनिता आधुलकर, संगीता शेंदरेची. संगीता यांचे काम आणि जिद्द आणि नेर्तृत्व कौशल्यामुळे महिलांनी त्यांना वर्धिनीच्या अध्यक्षा म्हणुन निवड केली.

परदेश वरीतून जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल

वर्धिनी हा महाराष्ट्रातील एकमेव संघ आहे त्याची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे झाली आहे. पाच लाखाची उलाढाल वर्षाला होत असल्याने त्यांना महाराष्ट्र साधनांच्या उमेद प्रकल्प आणि इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सन्फ्रान्सिस्को न्यूयॉर्क बोस्टन या शहरात जाऊन जागतिक बाजारपेठ आणि त्याच्या कसोट्या शिकायला मिळाल्या. फेसबुक आणि गुगलला भेट देण्याची संधी मिळाली. तिथल्या उद्योजकांना भेटून ऑनलाइन बाजरपेठ विक्री आणि ऑर्डर मिळाली. जीवनोन्नतीचे फेसबुक अकाऊंट इथेच उघडले ज्या माध्यमातून त्यांना आता ऑर्डर मिळत असल्याचेही त्या सांगतात.

सुरवातीला बाजारात गेल्या की महिला म्हणून साड्यांवर नजर जायची...आता मात्र नजर जाते ती वेगवेगळ्या बॅगांची, रंगाची, बनवाट आणि निर्मिती कौशल्याची इतका बदल या कामातून झालाय. संगीताताई परदेशातून आल्यानंतर त्यांनी सांगितल्या जागतीक बाजारपेठ मिळवण्यासाठी कामाचे कौशल्य आणि सुबकता याला महत्व देऊन बदल करत आहोत. हळू हळू कामाचा उत्तम दर्जा गाठण्यासाठज प्रयत्न सूरु असल्याचे प्रिया धपके आणि करिश्मा फटिंग सांगतात.

वर्ध्यातील छोट्याशा सिंधी मेघे येथील दहा बाय दहाच्या खोलीतील व्यवसाय उंचा भरारी घेऊ लागला. महिलांनी स्वप्न पाहतात पण पूर्ण होत नाही अश्या म्हणतात...पण त्यांनी स्वप्न पाहावे आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे संगीता गायकवाड सांगतात. याच या प्रवासला जागतिक महिला दिंनी ईटीव्ही भारत कडून सलाम आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा...!

बातमीला शेवटी पिटीसी जोडावा.

पराग ढोबळे, वर्धा.
एटीव्ही भारत.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.