ETV Bharat / state

तिची 'प्रतीक्षा' फळाला, पन्नाशी'नंतर दिला बाळाला जन्म - wardha hospital

पन्नाशी पार केल्यांनातर एका जोडप्याच्या आयुष्यात मुलीच्या जन्माने आनंद बहरला आहे. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने दाम्पत्याला मुलगी झाली आहे

टेस्ट ट्यूब बेबी
author img

By

Published : Mar 14, 2019, 1:03 PM IST

वर्धा - आई होणे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. परंतु, विविध अडचणींमुळे अनेक महिलांना मातृत्त्वापासून वंचित रहावे लागते. मात्र, विज्ञानाने या समस्येवर मात केली आहे. पन्नाशी पार केल्यांनातर एका जोडप्याच्या आयुष्यात मुलीच्या जन्माने आनंद बहरला आहे. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने दाम्पत्याला मुलगी झाली आहे.

टेस्ट ट्यूब बेबी

नर्मदा श्रीराम वाकोडे या ५२ वर्षाच्या शेतकरी कुटुंबातील आहे. त्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या चांगलवाडीच्या रहवासी आहेत. ३० वर्षांपूर्वी श्रीराम आणि नर्मदा यांचे लग्न झाले आहे. मागील ३० वर्षांपासून ते मूल होण्याची उपचार घेत होते. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच आली. वय वाढत असल्याने नर्मदा गुडघे यांना गुडगेदुखीचा त्रास सुरू झाला. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयत त्या गुडघेदुखीच्या उपचारासाठी आल्या होत्या. मात्र, इथे त्याचा आयुष्याला कलाटणी मिळाली.

रुग्णालयाच्या टेस्ट ट्यूब बेबी विभागाच्या प्रमुख दीप्ती श्रीवास्तव यांनी त्याची पाहणी करत त्यांचे रिपोर्ट तपासले. त्या आई होऊ शकतात अशी माहिती डॉक्टरांनी त्यांना दिली. नर्मदा यांची पहिल्याच प्रयत्नामध्ये गर्भधारणा झाली. वयाच्या ५२ व्या वर्षी आई होण्याच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. याच रुग्णालयात ९ महीने राहून त्यांनी उपचार घेतले. या दाम्पत्याला मुलगी झाली आहे. खुप प्रतीक्षेनंतर अपत्य झाल्याने त्यांनी मुलीचे नाव प्रतीक्षा ठेवले आहे. ३० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाल्याने हे नाव दिल्याचे डॉ. दीप्ती सांगतात. आता आई आणि बाळ स्वस्थ आहेत. मागील ९ महिन्यांत डॉक्टर आणि स्टाफ त्यांचे कुटुंब झाल्याचे नर्मदा सांगतात.

९ महिने घेतला दवाखान्यात उपचार

नर्मदा यांनी आई होण्यासाठी चक्क ९ महिने दवाखान्यात काढले. त्यामुळे रुग्णालयच त्यांचे माहेर असल्याच्या भावना नर्मदा यांनी व्यक्त केल्या. विशेष म्हणजे मेनोपॉज नंतरही त्यांची गर्भधारणा झाली. यातही शुगर पेशंट असल्याने देखरेख ठेवत त्याच्यावर उपचार झाले.

उद्ध्वस्त संसारला आनंदाची पालवी देणारी टेस्ट ट्यूब प्रणाली

टेस्ट ट्यूब बेबी होणे हे वैज्ञानिकदृष्टया केवळ १८ टक्के ते ३० टक्के शक्य आहे. यात अनेक डॉक्टर १०० टक्के खात्री देत खोट सांगत असल्याचे दिसून येते. मूल होत नसल्याने महिला घटस्फोट, पुनर्विवाह यासारखे पर्याय स्वीकारत आयुष्य उध्वस्त करून घेतात. पण यापेक्षा टेस्ट ट्युब बेबी उपचाराचा पर्याय एकदा तरी स्वीकारत आयुष्यात आई वडील होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. दीप्ती श्रीवास्तव करतात. विशेष म्हणजे याला लाखो रुपये लागत असल्याचे सांगत पैसे उकळण्याचे काम सध्या अनेक ठिकाणी सुरू असल्याचेही त्या सांगतात.

Intro:R_MH_13_MARCH_WARDHA_OLD_AGE_MOTHER

यात आणखी व्हिजवल लागल्यास सांगावें, कॅमेराचे अतिरिक्त व्हिजवल शॉट्स आहे.
दिप्तीच्या उपचाराने 52व्या वर्षी नर्मदेची आई होण्याची 'प्रतीक्षा' पूर्ण
- वयाच्या 52व्या वर्षी लग्नाच्या 30 वर्षानंतर झाली
- टेस्ट ट्यूब बेबी ने पूर्ण झाली 'प्रतीक्षा'
- 9 महिने दवाखाण्यातच घेतला उपचार
- आनंद गगनात मावेना, सावंगी मेघे रुग्णालयाचे आभार
- नर्मदा 52 वर्षाची तर श्रीराम 54 वर्षाचे
- दवाखाना माहेर झाल्याचा भावना

वर्धा - आई होणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्नं असते. महिलेचं जीवन पूर्णत्व आई झाल्यानंतर मिळते. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालया टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने पहिल्या सायकल मध्ये गर्भधारणा झाली. अकोल्या जिल्ह्यातील या दाम्पत्याला पन्नाशी पार केल्यांनातर आई वडील झाले. या मुलीच्या जन्माने त्याचा आयुष्यात जणू पुनर्जन्म झाल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत आहे.

नर्मदा श्रीराम वाकोडे या 52 वर्षाच्या शेतकरी कुटुंबातील आहे. त्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या चांगलवाडीचे रहवासी आहे. तीस वर्षांपूर्वी श्रीराम आणि नर्मदाचे लग्न झाले. मागील ते मागील तीस वर्षांपासून आई वडील होण्याची इच्छा मनात घेऊन उपचार घेत होते. यासाठी त्यांनी पैसाही खर्च केला आणि अनेक जिल्ह्यातील दवाखान्यात इच्छा घेऊन गेले. त्यांचा नशिबी मात्र निराशाच आली. वय वाढत असल्याने शुगर गुडघे दुःखी सारखे आजाराने ग्रस्त झाले. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयत त्या गुडघे दुखीच्या त्रासासाठी आल्या. इथे त्याचा आयुष्याला कलाटणी मिळाली.

गायनिक विभागाच्या आणि टेस्ट ट्यूब बेबी विभागाच्या प्रमुख दीप्ती श्रीवास्तव यांनी त्याची पाहणी करत रिपोर्ट तपासले. त्यांना आई होऊ शकते हा होकार देताच वाकोडे दाम्पत्याच्या नवीन जन्मच मिळाला. नर्मदा याचा सकारात्मक याने पहिल्या सायकलमध्ये गर्भधारणा झाली. वयाच्या 52व्या वर्षी आई होण्याच स्वप्नं पूर्ण झालं. याच रुग्णालयात नऊ महीने राहून त्यांनी उपचार घेतला. आता आई आणि बाळ स्वस्थ असल्याचे डॉ दीप्ती श्रीवास्तव सांगतात. इथे विशेष म्हणजे या नऊ महिन्यात नर्मदा याना माहेरी असल्याच सांगतात. डॉक्टर आणि स्टाफ त्यांना हे कुटुंब झालं.

या नऊ महिन्यात एक एक दिवस नर्मदा वाकोडे यांनी आई होण्याच स्वप्नं पहिला. त्यांना मुलगी झाली. तिला सध्या प्रतीक्षा हे नाव इथेच मिळाल. 30 वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाल्याने हे नाव दिल्याचं डॉ दीप्ती सांगतात. तर नर्मदा याचा आनंद आता गगनात मावत नसल्याचं आश्रू नायनायी आनंद व्यक्त करतात. यासाठी शब्दा शब्दा यानंतर डॉ श्रीवास्तव यां देवरूपाने लाभल्याच बोलून दाखवला. तेच श्रीराम वाकोडे हे आता मुलीला खेळवण्यात खुश झाले आहे. दोघांना आता वयाची 50 पार केली असली तरी 20 वर्षाचे तरुनत्व या चिमुकलीने बहाल केले.

वेब साठी....
9 महिने घेतला दवाखान्यात उपचार
नर्मदा यांनी आई होण्यासाठी चक्क नऊ महिने दवाखान्यात काढले. विशेष म्हणजे मेनोपॉज नंतरही त्याना पहिल्या सायकल मध्ये यश मिळाले. याचं डॉक्टरांना फार कौतुक आहे. यांतही शुगर पेशंट असल्याने देखरेकीत ठेवत त्याच्यावर उपचार झाले.

ओळख सांगण्यास टाळाटाळ....
टेस्ट ट्यूब बेबी झाल्यास आई झालेल्या महिला नाव सांगायला पुढे येत नाही. पण नर्मदा याला अपवाद ठरतात. आई व्हायचे असेल तर एकदा नकी हिम्मत न हारता सकारत्मक रीतीने उपचार घ्या. हे सांगताना ओळख लपविण्याएकही याची माहिती आता इतराना सांगनार जेणेकरून आई होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. या दिवस येण्यापूर्वी तीस वर्षाचा समाजाचा संघर्ष डोळ्यात अश्रू आणल्या शिवाय राहत नाही.

उध्वस्त संसारला आनंदाची पालवी देणारी ही टेस्ट ट्यूब प्रणाली.....

टेस्ट ट्यूब बेबी होणे हे वैज्ञानिक दृष्टया केवळ 18 टक्के ते 30 टक्के हमी देतात. यात अनेक व्यवसायिक होत 100 टक्के खात्री देत खोट सांगत असल्याचे दिसून येते. पण असे असले तरी अनेक जण महिलांना दोष देतात. घटस्फोट दुसरा विवाह यासारखे पर्याय स्वीकारत आयुष्य उध्वस्त करून घेतात. पण यात यापेक्षा हा पर्याय एकदा तरी स्वीकारत आयुष्यात आई वडील होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ दीप्ती श्रीवास्तव सांगतात. विशेष म्हणजे याला लाखो रुपये लागत असल्याचे सांगत पैशे उकळण्याकगे काम सध्या अनेक ठिकाणी सुरू असल्याचेही त्या सांगतात.

आई होण्यासाठी सकारात्मक विचारांची ही गरज

आचार्य विनोबा भावे रुग्णालयत मागील 3 वर्षपासून टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू आहे. या तीन वर्षांत जवळपास निराश झालेल्या 50 दांपत्याना आई वडील होण्याचा स्वप्न पूर्ण झाले. पण यासाठी आई होणाऱ्या महिला तसेच कुटुंबीय सकारत्मक असल्यास रुग्णाला त्याचा अधिक फायदा होताना दिसतोय. त्यामुळे याचा फायदा नक्कीच उपचारात दिसून येत असल्याकगे नर्मदा याचा उदाहरणावरून स्पष्ट होत असल्याचे सांगतात.

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.