वर्धा - वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घाट लिलाव नसल्याने अवैध रेती चोरी आणि दारूबंदी असतांना हिट असलेली दारूविक्रीचा बंदोबस्त करण्याच्या सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. ते वर्धा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यलयात कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेत होते.
जिल्ह्यातील रोहिणी घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. रेती चोरीला थांबवण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्तरित्या कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. तसेच जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैध दारूविक्री होत असल्याने कारवाई करण्यास सांगितले. जिल्ह्याला लागून असलेल्या नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी विवेक भिमांवर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर उपस्थित होते.
हिंगणघाट येथे ग्रामीण पोलीस स्टेशनची मागणी -
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत माहिती देताना हिंगणघाट तालुक्याची सुमारे अडीच लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुक्यात नवीन ग्रामीण पोलीस ठाणे गरजेचे आहे. यासाठी प्रस्ताव तयार असून मान्यता देण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांनी केली. तसेच पोलीस विभागाचा वाहनांसाठी पेट्रोल पंप सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. शिवाय जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह 126 पदे रिक्त असल्याची माहिती दिली.
बैठकीला महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर महामार्ग पोलीस उपाध्यक्ष पांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, पियुष जगताप, तृप्ती जाधव, सहाय्यक परिवहन अधिकारी विजय तिरणाकर या बैठकीला उपस्थित होते.
वर्धा : जिल्ह्यातील रेती चोरी आणि दारू विक्रीचा बंदोबस्त करा - गृहमंत्री - गृहमंत्री अनिल देशमुख
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घाट लिलाव नसल्याने अवैध रेती चोरी आणि दारूबंदी असताना हिट असलेली दारूविक्रीचा बंदोबस्त करण्याच्या सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.