वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील इंझाळा येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी वर्धा जिल्हा सत्र न्यायाधीश संयजकुमार खोंगल यांनी आरोपी पती अशोक उईकेयास जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर या कृत्यात मदत करणारा त्याचा भाऊविजय उईकेयालापाच वर्षांच्यातुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
इंझाळा येथील कल्पना अशोक उईके (वय ४७ रा. इंझाळा) असे मृत महिलेचे नाव आहे. ३ ऑक्टोबर २०१३ च्या रात्री आरोपी पतीने त्यांची गळफास लावून हत्या केली होती. कल्पनाचा मृत्यू झाल्यावर आपल्या भावाच्या मदतीने घरातील स्वयंपाक घरात खड्डा खोदून त्यांचा मृतदेह जमिनीत पुरला होता. अशोकने ही माहिती फोनवरून आपल्या मुलीला दिली. त्यानंतर हिंगणघाट पोलिसात स्वतः जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. तपासात पत्नीची हत्या चारित्र्याच्या संशयावरून केल्याचे समोर आले. या प्रकरणात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय कुमार खोंगल यांनी मुख्य आरोपी अशोक उईके यास जन्मठेप व ५ हजार रुपय दंड तसेच पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात विजय उईके यास ५ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी वकील प्रसाद सोईतकर व सहाय्यक सहकारी वकील अमोल कोटमबकर यांनी काम पाहिले. तर तपास अधिकारी म्हणून व्ही. के. पारधी तर पैरवी सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण जामबुळकर यांनी केली.