वर्धा - आज दुपारी वर्ध्यात पावसाच्या सरी बरसल्या. यंदा पावसाची सरासरीत घट झाली आहे. अजून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावलेली नाही. जमिनीत ओलावा कमी झाल्याने पिके करपू लागली आहेत.
वर्ध्यात जुलै महिन्याची सरासरी ही ३५० मिमी च्या घरात असते. यावर्षी मात्र आजपर्यत 235 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. धरणातील पाणी साठा संपलेला असून मृत साठ्यावर वर्धेकराची तहान भागवली जात आहे. यामुळे जी परिस्थिती जून महिन्याची असते तीच परिस्थीती जुलै महिन्यात आल्याने पाणी प्रश्न गंभीर होऊन बसला आहे.
जिल्ह्यात गरज दुष्काळ निवारण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कागदोपत्री कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांच्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.