ETV Bharat / state

VIDEO : मी शपथ घेतो की, "पुन्हा अशी चूक करणार नाही..." - wardha mask story

मास्क न घालणाऱ्याला धडा देण्याबरोबरच जनजागृतीही केली जात आहे. यात वर्ध्याच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी कारवाई करण्यापेक्षा वेगळीच शक्कल लढवली. शुक्रवारी सायंकाळी शिवाजी चौकात मास्क न घालणाऱ्यांना चक्क शपथच देऊन टाकली.

मी शपथ घेतो की...
मी शपथ घेतो की...
author img

By

Published : Oct 31, 2020, 11:48 AM IST

Updated : Oct 31, 2020, 11:54 AM IST

वर्धा - सध्या 'मिशन मास्क' मोहीम जोरात सुरू आहे. मास्क न घालणाऱ्याला धडा देण्याबरोबरच जनजागृतीही केली जात आहे. यात वर्ध्याच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी कारवाई करण्यापेक्षा वेगळीच शक्कल लढवली. शुक्रवारी सायंकाळी शिवाजी चौकात मास्क न घालणाऱ्यांना चक्क शपथच देऊन टाकली. यात मास्क न घालण्याची चूक पुन्हा करणार नाही, असेही वदवून घेण्यात आले.

शहरात मागील काही दिवासांत कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे मनातील भीती काही प्रमाणात कमी झाल्याने काही नागरिक मास्क न लावता फिरत आहे. त्यामुळे आटोक्यात आलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी शिवाजी चौकात मास्क न घालणाऱ्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विपीन पालीवाल यांनी काहींचा वर्ग घेतला. शहरात मास्क न घालता दुचाकीवर फिरणाऱ्या 36 जणांना प्रत्येकी 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

मी शपथ घेतो की...

घ्या शपथ, कोरोना असेपर्यंत चूक करणार नाही...

नगर पालिकेकडून गांधीगिरी करण्यात आली. मास्क न घालणाऱ्यांना शिवाजी चौकात एका रांगेत उभे करण्यात आले आणि शपथ घेण्यासाठी सर्वांनी हात पुढे केले. मास्क न घातल्याने चूक केली आहे. पण जोपर्यंत कोरोना आहे, तोपर्यंत स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांना मास्क घालण्यास सांगेन. तसेच मास्क न घालण्याची चूक पुन्हा करणार नाही, अशी शपथ त्यांच्याकडून घेण्यात आली. यासह दंडही वसूल करण्यात आला.

Last Updated : Oct 31, 2020, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.