ETV Bharat / state

संधी मिळताच 'त्या' घटनेचा बदला घेतला जाईल - प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

author img

By

Published : Jun 21, 2019, 8:28 PM IST

एका सात वर्षाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करत तापलेल्या टाईल्सवर बसविल्याप्रकरणी मातंगसमाजाने वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेही सहभागी झाले होते.

मातंग समाजाने काढलेल्या मोर्चाविषयी बोलताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे

वर्धा - आर्वी तालुक्यात एका सात वर्षाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करत तापलेल्या टाईल्सवर बसवले होते. या प्रकारात मुलाला गंभीर इजा झाली. याच घटनेच्या निषेधार्थ मातंगसमाजाने वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेही सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना ढोबळे म्हणाले, लहान मुलासोबत झालेल्या प्रकाराने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याच समाजाच्या लेकरावर का अन्याय होतो? सोबतच संधी भेटल्यावर याचा बदला घेतला जाईल. त्यासाठी समाजातील तरुण फकिरानी संकल्प केला पाहिजे, असेही ढोबळेंनी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवले.

मातंग समाजाने काढलेल्या मोर्चाविषयी बोलताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे

या प्रकरणात पोलिसांवर ताशेरे ओढत योग्य तपास न झाल्यास न्यायालयात दाद मागू असे ढोबळे म्हणाले. प्रकरणातील आरोपी अमोल ढोरेसह आणखी काही लोक सहभागी आहेत. तसेच आरोपी हा दारूचा व्यवसाय करतो. त्याचे हितसंबंध असल्याने पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री यांना सांगून न्याय देण्याची मागणी केली आहे, असेही ढोबळे म्हणाले.

या मोर्चाची सुरुवात शिवाजी चौकातून करण्यात आली. शहरातील प्रमुख बडे चौक, बजाज चौक, सिव्हिल हॉस्पिटल होत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचला. यावेळी सात वर्षाच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला पुरुष पुरुष उपस्थित होते. या मोर्च्यात जिल्हाध्यक्ष अजग डोंगरे, भीमराव डोंगरे, दिलीप पोटफोडे, अजय डोंगरे, हिराताई खडसे, आदी सहभागी झाले होते.

Intro:mh_war_matang_samaj_morch_vis1_7204321

संधी मिळेल तेव्हा बदला घेऊ- माजी राज्यमंत्री लक्ष्मण ढोबळे

वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंगसमाजाचा मोर्चा,
- पोलिसांकडून न्याय मिळाला नाहीतर कोर्टात जाऊ
- मुख्यमंत्र्यांनसमोर मांडला प्रश्न
लहान चिमुकलयासोबत झालेलता प्रकाराने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. याच समाजाच्या लेकरावर का अन्याय होतो? असा सवाल विचारला. संधी भेटल्यावर याचा बदला घेतला जाईल. यासाठी समाजातील तरुण फकिराने पुढे येत संकल्प घेतल्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रासार माध्यमांसमोर बोलताना बोलून दाखवले.

वर्ध्यातील आर्वी तालुक्यात एका सात वर्षाच चिमुकल्यावर अमानुषपणे मारहाण करत त्याला तापलेल्या टाईल्सवर बसवत इजा पोहचवली. याच घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मातंग समाजाच्या मोर्च्यात सहभागी होत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले.

या प्रकरणात पोलिसांवर ताशेरे ओढत योग्य तपास न झाल्यास कोर्टात दादा मागू असे म्हणाले. प्रकरणातील आरोपी अमोल ढोरे यांच्यासह आणखी काही लोक सोबत असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणात आरोपी हा दारूचा व्यवसाय करतो. त्याचे हितसंबंध असल्याने पोलीस पाठीशी घालत आल्याचा आरोप या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री यांना सांगून न्याय देण्याची मागणी केली आहे असेही म्हणाले.

या मोर्च्याची सुरवात शिवाजी चुकातून सुरवात करण्यात आली. शहरातील प्रमुख बडे चौक बाजज चौक, सिव्हिल हॉस्पिटल होत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचला. यावेळी मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला पुरुष सात वर्षाच्या चिमुकल्याच्या न्याय देण्याचा मागणीसाठी दस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. या मोर्च्यात जिल्हाध्यक्ष अजग डोंगरे, भीमराव डोंगरे, दिलीप पोटफोडे, अजय डोंगरे, हिराताई खडसे, आदींसह अनेकजण यात सशभगी झाले होते.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.