वर्धा - जिल्ह्यात 1314 मतदान केंद्रात मतदान होत आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली. वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट अशा चार मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 11 लाख 49 हजार 558 मतदार आहेत. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, येथे सकाळी गर्दी होण्यापूर्वी दोन मैत्रिणींनी मतदान केले. या दोघी ज्येष्ठ महिला एकमेकींच्या मैत्रिणी असून त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोबत आल्या होत्या. रोज सकाळी दोघी एकत्र फिरायला जात असून आज तशाच पद्धतीने एकत्र मतदानालाही आल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. पण ढगाळ वातावरणामुळे उत्साह कमी असल्याचे दिसून येत आहे.