ETV Bharat / state

वर्ध्यात अत्यावश्यक सेवेत नसणारी ४३ दुकाने सील, ३६ हजारांचा दंड वसूल

author img

By

Published : Apr 22, 2020, 7:56 AM IST

Updated : Apr 22, 2020, 10:49 AM IST

जिल्हा प्रशासनाने सकाळपासून सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईत 43 दुकाने सील करण्यात आली. अत्यावश्यक सेवा म्हणून आठवड्यातील ठराविक एकाच दिवशी दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण शिथिलता समजून दुकाने उघडत नियमांचे उल्लंघन करणे अनेकांना महागात पडले.

अत्यावश्यक सेवेत नसणारी ४३ दुकाने सील
अत्यावश्यक सेवेत नसणारी ४३ दुकाने सील

वर्धा - जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही, म्हणून रस्त्यावर फिरायला मोकळे असे समजणारे आज कारवाईच्या कचाट्यात अडकले. यासह संचारबंदी शिथिल समजून दुकाने उघडून बसणाऱ्यांवरसुद्धा दंडात्मक कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले. 20 एप्रिलनंतर शेती संबंधित कामे आणि उद्योगांना मिळालेली मुभा पाहता रस्त्यांवर नागरिकांची गर्दी उसळली.

प्रशासनाने कडक कारवाई करत 3 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याचे नागरिकांना सांगितले. जिल्हा प्रशासनाने सकाळपासून सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईत 43 दुकाने सील करण्यात आली. अत्यावश्यक सेवा म्हणून आठवड्यातील ठराविक एकाच दिवशी दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण शिथिलता समजून दुकाने उघडत नियमांचे उल्लंघन करणे अनेकांना महागात पडले.

सील केलेल्या दुकांनाना आता पुढील आदेशानुसार 3 मेपर्यंत तरी दुकाने उघडता येणार नसल्याचे सांगण्यात आले. दुकानांना सील ठोकण्याची कारवाई नगर परिषदेकडून करण्यात आली आहे. याशिवाय मास्क न वापरणाऱ्या 60 जणांवर कारवाई करत त्यांना दंड ठोठावला आहे. यासह दुचाकीने विनाकारण फिरणे, डबल शीट, दुकाने उघडे ठेवणे, अशी 113 प्रकरणे एका दिवसात सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नोंदवण्यात आली. या माध्यमातून 36 हजार 500 रुपयांचा दंड वर्धा महसूल क्षेत्रात गोळा करण्यात आला.

वर्ध्यात अत्यावश्यक सेवेत नसणारी ४३ दुकाने सील

चोरट्या मार्गाने होत होती खर्रा विक्री -

या बंदच्या काळात चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात खर्रा तयार होत असल्याची महिती नायब तहसीलदार एस आर पाराजे यांना मिळाली. त्यांनी कारवाई केली. यामध्ये खर्रा घोटण्याची मशीन, सुपारी आणि सुगंधित तंबाखू असा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार प्रीती डुडूलकर, गटविकास अधिकारी, नप मुख्याधिकारी जगताप, नायब तहसीलदार एस. आर पाराजे, हेमा जाधवर, जिल्हा परिषद कृषी अधिकारी संजय बमनोटे, विस्तार अधिकारी हेमंत देवतळे, कनिष्ठ लिपिक भूमी अभिलेख आदींनी वेग वेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली.

Last Updated : Apr 22, 2020, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.