वर्धा - जिल्ह्यातील कानगाव जवळील चानकी भगवा गावालागत वाहणारी यशोदा नदीत दोघे बुडल्याची धक्कादायक घटना घडली. हे दोघेही नदी पात्रात रेती काढण्यासाठी गेले असल्याचे चर्चा परिसरात आहे. दोघांचेही कपडे आणि चपला नदीच्या काठावर दिसून आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. तुषार रवींद्र लाभाडे (२५), मंगेश सोनवणे(24) अशी बुडालेल्या युवकांची नावे असून ते दोघेही कानगांव येथिल रहिवासी आहेत.
रेती काढताना दोन तरुण नदीत बुडाले तुषार आणि मंगेश हे दोघेही नदी पात्रात रेती काढण्यासाठी गेले असावे. यावेळी नदीचे पाणी वाढल्याने किंवा नदी पात्रता खोल खड्ड्यात असलेल्या गाळामुळे अंदाज आला नसल्याने बुडाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नदीपासून काही अंतरावर रेतीचा साठाही दिसून आला. घटनेची माहिती कानगावचे सरपंच सतिश ठाकरे यांनी अल्लिपूर पोलिसांना दिली.रेती काढताना दोन तरुण नदीत बुडाले बेपत्ता असलेल्या युवकांचा नदीपात्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे. पाण्यात पोहणाऱ्याच्या मदतीने दोघांचा शोध घेतला जात आहे. पण पावसाळ्यामुळे पाणी गढूळ असल्याने शोधकार्यात अडचण जात आहे. अल्लीपूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक योगेश कामाले, जमादार चव्हान, महेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.