वर्धा - वर्धा जिल्ह्यातील रुगणालयात बाहेर जिल्ह्यातून आलेले 11 रुग्ण हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. यात 5 जण याआधीच कोरोनामुक्त झाले. आज पुन्हा दोघे कोरोना निगेटिव्ह आल्याने एक मोठा दिलासा मिळाला आहे. आता बाहेर जिल्ह्यातील केवळ 3 जण उपचार घेत आहे. या दोघांना सावंगी मेघे रुग्णालयातुन सुटी झाली आहे. यामध्ये एक युवती आणि एक व्यक्तीचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील एक युवती आणि उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील कामगार हे कोरोनाबाधित होते. यांच्यावर सावंगी येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात कोरोना विषाणू उपचार सुरू होते. त्यांची 14 दिवसानंतरची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना कोरोनामुक्त म्हणून रुग्णालयातून आज सुटी देण्यात आली.
मागील दोन दिवसात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह न आल्याने वर्धेकरांना दिलासा मिळाला आहे. यात दोघांना सुटी मिळाल्याने नवीन रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. शिवाय रुग्ण संख्येचा आकडा सुद्धा घटू लागल्याने नक्कीच पुन्हा ग्रीन झोनकडे वाटचाल होताना दिसून येत आहे.
बाहेर जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 होती. त्यापैकी वाशीम येथील एकाच मृत्यू झाला आणि 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले. उर्वरित तीन रुगणांवर उपचार सुरू आहे. वर्धा जिल्ह्याचे रहिवासी असलेले 8 रुग्ण आहे. त्यापैकी 7 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्या 7 पैकी 6 रुग्णांवर जिल्ह्यात तर एका रुग्णावर सिकंदराबाद येथे उपचार सुरू आहेत.
सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातून सुट्टी देताना कोरोनावर मात करणाऱ्या दोघांचेही टाळ्यांचा गजरात स्वागत आणि कौतुक करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, परिचरिका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
वर्धेत उपचार घेत असलेल्या बाहेर जिल्ह्यातील दोन रुग्णांची कोरोनावर मात - wardha corona update news
वर्धा जिल्ह्याला मागील दोन दिवसात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह न आल्याने दिलासा मिळाला आहे. यात दोघांना सुट्टी मिळाल्याने नवीन रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. शिवाय रुग्ण संख्येचा आकडा सुद्धा घटू लागल्याने नक्कीच पुन्हा ग्रीन झोनकडे वाटचाल होताना दिसून येत आहे.