ETV Bharat / state

वर्ध्यात कोरोनाचा प्रवेश; दोघांचा अहवाल आला पॉझिटिव्ह - वर्धा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

वर्धा जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण सापडला नव्हता. त्यामुळे वर्धा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, आज सकाळी दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने वर्धा ग्रीन झोनच्या बाहेर पडला आहे. यातील एक रूग्ण हा वाशिम जिल्ह्यातून उपचारासाठी वर्ध्यात आला होता. तर आर्वी तालुक्यातील महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Wardha Hospital
वर्धा रुग्णालय
author img

By

Published : May 10, 2020, 2:24 PM IST

वर्धा - राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना वर्धा जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण सापडला नव्हता. त्यामुळे वर्धा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, आज सकाळी दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने वर्धा ग्रीन झोनच्या बाहेर पडला आहे. यातील एक रूग्ण हा वाशिम जिल्ह्यातून उपचारासाठी वर्ध्यात आला होता. तर आर्वी तालुक्यातील महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वर्ध्यातील सावंगी मेघेचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात विदर्भासह अनेक ठिकाणाहून रुग्ण येतात. यात वाशिम जिल्ह्यातील एक रूग्ण आला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्वी तालुक्याच्या हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूनंतर चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगितले जात आहे. 8 मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेला दम्याच्या त्रास झाल्याने तिला खासगी रुगणालयात नेण्यात आले. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.

यानंतर जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेसह कंटेन्मेंट प्लॅनच्या कामकाजाला सुरूवात केली आहे. हिवरा तांडा गावासह लगतच्या गावातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.