वर्धा - नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावतीकडून नागपूरला जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. यात हा ट्रक कास्टिक सोडा पावडर घेऊन जात होता. ट्रकच्या कॅबिन खालच्या भागात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच लागलीच घटनेच्या काही अंतरावर असलेल्या सिडेट कंपनीतून टँकरने पाणी आणून पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आग लागताच चालकाने ट्रक थांबवल उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्या यश आल्याने ट्रकमधील कास्टिक सोडा पावडरचे नुकसान झाले नाही. दरम्यान, या महामार्गावरील वाहतून काही काळ ठप्प झाली होती. आगी नियंत्रणात येताच पोलिसांनी मार्ग मोकळा करुन दिला. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांत झाली आहे.
हेही वाचा - सलून व्यवसायिकांनी वाटेतच अडवला राज्यमंत्री सुनील केदारांचा ताफा