वर्धा - हिंगणघाट-उमरेड मार्गावरील धोंडगाव जवळ भरधाव वेगाने जात असलेल्या ने २ दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दुचाकी चालक उमेश न्याहरे (२९) आणि द्वारकाबाई भाऊराव न्याहरे (७०) तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक मंगेश प्रभार कोल्हे (२५) हे या अपघातात जखमी झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच गिरड पोलिसांनी तिन्ही जखमींना प्राथमिक उपचारासाठी समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल केले आहे.
जखमी द्वारकाबाई भाऊराव न्याहरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या अपघाताची नोंद गिरड पोलीस ठाण्यात केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार महेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.