ETV Bharat / state

वर्ध्या जिल्ह्यातील आष्टीत येथे वीज पडून तिघे जखमी; उपचारासाठी अमरावतीला रवाना

आष्टी तालुक्यातील पोरगव्हाण शिवारातील शेतात वीज पडून तिघे जखमी झाल्याची घटना घडली. पावसापासून बचावासाठी तिघे झाडाखाली उभे असताना झाडावर वीज पडल्याने तिघे जखमी झाले. तीघांवरही ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचार करण्यात आले.

author img

By

Published : Oct 9, 2020, 8:57 PM IST

Three people injured in lightning strike in Wardha
वर्ध्याच्या आष्टीत वीज पडून तिघे जखमी; उपचारासाठी अमरावतीला रवाना

वर्धा - जिल्ह्यात आज अनके भागात पावसाने हजेरी लावली. यात आष्टी तालुक्यातील पोरगव्हाण शिवारातील शेतात वीज पडून तिघे जखमी झाल्याची घटना घडली. अचानक विजेच्या कडकडाटसह पावसाचे आगमन झाले. पावसापासून बचावासाठी तिघे झाडाखाली उभे असताना झाडावर वीज पडल्याने तिघे जखमी झाले. सुदैवाने जिवीत हानी टळली. ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे तिघांवर उपचार करण्यात आले.

वर्ध्या जिल्ह्यातील आष्टीत येथे वीज पडून तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जय गजानन नेहारे (14), आरती किसनराव राऊत (16), बंडू बाबाराव मोहन मनोहरे (25) अशी जखमींची नावे आहे. आष्टी तालुक्यातील पोरगव्हाण येथे प्रवीण केचे यांच्या शेतात खात टाकण्याचे काम सुरू होते. या कामावर जय नेहारे, आरती राऊत आणि बंडू मनोहरे असे तिघेही गेले होते. शेतात खात टाकण्याचे काम सुरू असताना अचानक विजेचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. यावेळी शेतातली कडू लिंबाच्या झाडाखाली तिघेही जाऊन थांबले. काही वेळात अचानक वीज कडाडली आणि त्याच झाडावर जाऊन पडली. यावेळी तिघेही जखमी झाली. लोकांना माहिती होताच गर्दी झाली. लागलीच त्या तिघांना उचलून आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.