ETV Bharat / state

Protection of "Bapu Kuti"  : ऐतिहासिक वास्तू असलेल्या "बापू कुटी"चे पावसाळ्यात असे होते संरक्षण..... - सिंदीच्या पानांचे आच्छादन

महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) वास्तव्य असलेली "बापू कुटी" (Bapu Kuti) आहे त्याच अवस्थेत अजूनही आहे. काय आहे रहस्य की ही कुटी अजून तशीच आहे. एवढा 84 वर्षांचा काळ लोटूनही वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातील (Sevagram Ashram) कुटी आहे त्याच अवस्थेत आहे, तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे. तिच्या संरक्षणासाठी सिंदीच्या झाडाची पाने तिला लावली जातात आणि त्या सिंदीच्या झांडांच्या पानांचे आच्छादन त्याला असते.

Cinnamon Tree Leaf Cover
सिंदीच्या झाडांची पानांचे आच्छादन
author img

By

Published : Jun 4, 2022, 11:05 PM IST

Updated : Jun 5, 2022, 8:52 PM IST

वर्धा : गांधीजींच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमी म्हणजे वर्ध्याचे सेवाग्राम आश्रम होय. वर्ध्याचे हेच सेवाग्राम आश्रम स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार आहे. याच भूमीतील महात्मा गांधीचे वास्तव असलेली बापू कुटीला (Bapu Kuti where Mahatma Gandhi Lived) तब्बल 84 वर्षांचा काळ लोटला. अनेक उन्हाळे पावसाळे या कुटीने पाहिले असतील. पण, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आजही त्याच पद्धतीने ऐतिहासिक ठेवा जपला जातो. यासाठी सिंदीची पाने हे या कुटीचे संरक्षण करते तरी कसे हे जाणून घेऊ या विशेष रिपोर्टमधून...

बापू कुटी सेवाग्राम आश्रम

बापूकुटीच्या भिंतींना सिंदीच्या पानांचं आच्छाद : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेवाग्रामच्या पावन भूमीत 1936 मध्ये जेव्हा जमनाला बजाज यांच्या आग्रहाने महात्मा गांधींजी वर्ध्यातील तत्कालीन पालकवाडी येथे आले. त्यानंतर महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे राहण्यास संमती दिली. स्थानिक कामगार आणि स्थानिक वस्तूंच्या साह्याने ही बापू कुटी तयार झाली. या परिसरात अशाच पद्धतीने मातीच्या साह्याने बा कुटी, बापू कुटी, आदी निवास, रसोडा, परचुरे कुटी, बापूचे कार्यालय आश्रम परिसरात आहे.

अशी आहे संरक्षण पद्धत : पण आठ दशके लोटूनही ऐतिहास बापू कुटी आहे त्याच स्थितीत आहे. दररोज शेण आणि मातीच्या साह्याने सारवून या कुटीचे जतन केले जात आहे. पण, पावसाळ्यात जर पाणी आले, तर या भिंती पाण्याने खराब होऊन केव्हाच पडल्या असत्या. पण, पावसाच्या पाण्याचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी सिंदीच्या झाडाची पाने (झाडू तयार होते त्या झाडाची पानं) त्यापासून आच्छादन देण्यासाठी झांजी (एक विशिष्ट पद्धतीने बांधून भिंती झाकणारी झांजी) भिंतीना लावली जाते.

अशा तयार होता झांझ्या : या झांझी बनवणारे कारागीर मोजकेच असतात. त्यामुळे हे कारागीर वेळोवेळी झांझी तयार करण्यासाठी बोलवले जातात. यातही जुनोना गावातून सिंदीची पाने आणली जातं होती. मात्र, तिथे यंदा झाडे कमी असल्याने पूजई गावातून आणल्या जाते. त्यानंतर या पानांना बांबूच्या कड्यांवर विशिष्ट पद्धतीने ठेवले जाते. त्यानंतर त्याला कसून जोडून झांझ्या तयार केल्या जतात. पाण्यापासून बचावाकरिता लावलेल्या या सिंदीची पाने ही टोकदार असतात. त्यामुळे उतरत्या दिशेने पाय लावली की पाणी जमिनीच्या दिशेने पडून जाते. त्यामुळे भिंतीवर त्या पावसाच्या पाण्याचा काहीही परिणाम होत नाही. याच पद्धतीने वर्षानो वर्षांपासून या सिंदीच्या पानाच्या साह्याने ऐतिहासिक ठेवा जपला जात आहे.

दर्शनार्थींसाठी तयार होतात झांझ्या : सेवाग्राम आश्रमात दूरवरून दर्शनार्थी येत असतात. त्यामुळे भिंतींच्या संरक्षण केले जाते, त्याचप्रमाणे लोकांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी झांजा तयार केल्या जात असतात. साधारणतः दर तीन वर्षांनी झांझ्या बदलवल्या जातात. तसेच, सर्व मातीचे कवेलूमधून कुटीत पाणी गळती होत असल्यास पावसाळ्याच्या काळात त्यावरही दुरुस्तीचे काम केले जाते. अधून-मधून लाकडांना बुरशी लागली असल्यास किंवा बांबूच्या कमच्या आणि लाकूडफाटा बदलण्याचा कामही केले जाते. मात्र, ही दुरुस्ती साधारणत: 10 ते 15 वर्षांनंतर केले जात असल्याची माहिती आश्रम प्रतिष्ठानचे आकाश लोखंडे यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितली.

हेही वाचा : Wardha Sevagram Ashram : देशप्रेम जागृत करणारे प्रेरणास्थान वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम

Last Updated : Jun 5, 2022, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.