ETV Bharat / state

वर्ध्यात कोरोनाबाधितांची संख्या 13 वर, आज 3 रुग्णांची भर

author img

By

Published : Jun 9, 2020, 3:21 PM IST

या 3 कोरोनाबाधित रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 झाली आहे. मागील आठवड्यात रुग्ण कमी झाले वाटत असताना, शनिवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह आणि आज नव्याने 3 असे 5 रुग्ण सापडले आहेत.

Wardha Corona News
वर्धा कोरोना बातमी

वर्धा - जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 13 झाली आहे. हे तीन रुग्ण वर्धमनेरी आणि सिंदी रेल्वे येथील रुग्णांच्या निकट संपर्कातील आहेत.

वर्धमनेरी येथील 59 वर्षीय पुरुषाच्या संपर्कातील पत्नी (45 वर्षे) मुलगी (21 वर्षे) या दोघींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सिंदी रेल्वे येथील कोरोनाबाधित रेल्वे कर्मचाऱ्यांच्यासोबत काम करणारे रामनगर रहिवासी (59 वर्षीय) पुरुष कोरोनाबाधित असल्याचे आज (मंगळवारी) आलेल्या अहवालातून पुढे आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.