वर्धा - महात्मा गांधी यांचा सर्वाधिक काळ म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचा काळात ते सेवाग्राम आश्रमात राहिले. १० वर्षांचा हा कार्यकाळ जितका महत्वाचा होता. तितकेच महत्वाचे निर्णय, बैठका या भूमीत झाल्या. गांधींचा शेवट साहाव्यांदा गोळ्या घालून झालेल्या हल्यात झाला असला तरी एक असाच प्रयत्न त्यांचावर सेवाग्राम आश्रमात सुद्धा झाला होता.
महात्मा गांधी आणि मुस्लिम नेते जिन्ना यांची एक बैठक 1944 मध्ये मुंबईला होणार होती. या बैठकीला जाण्यासाठी महात्मा गांधी हे सेवाग्रामवरून मुंबईला जाणार होते. सकाळपासून सेवाग्राम आश्रमाच्या बाहेर आंदोलक जमले आणि बापुंनी काहीही केले तरी जिन्नाच्या भेटीला जाऊ न देण्याच्या प्रयत्नात ते होते. वरवर दिसणारा हा विरोध भेटीचा असला तरी यात त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यात बापू जाणार असल्याने त्यांच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. 1944 मध्ये तत्कालीन डीसीपी सकाळी बापूंच्या भेटीला आले. त्यांनी याबाबतची कल्पना दिली. यावेळी बापू आश्रमातून पायदळ निघत काही अंतरावर एका वाहनात जाणार होते.
हेही वाचा - गांधी १५० : बापूंचे 'सेवाग्राम' ठरतंय पर्यटन केंद्र!
मात्र, हा कट असल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी एका आंदोलकाजवळ 7 इंच लांब चाकू जप्त करण्यात आला. त्यावेळी ग.ल. थत्ते नामक इसमाजवळून हा चाकू जप्त करण्यात आला होता. त्यावेळी त्या ठिकाणी नथुराम गोडसे उपस्थित असल्याचा उल्लेख महादेव भाई नसताना बापुचे सचिव म्हणून काम पाहणारे किशोरभाई यांनी त्यांच्या डायरीत केला आहे. यासोबतच जंगनाथ फडणवीस लिखीत 'गांधी की शहादत', चुनीभाई वैद्य लिखीत 'गांधी की हत्या क्या सच क्या झूठ' यामधे स्वतःला गांधींला शहीद करणारा सावरकरांचा जमादार असल्याचा उल्लेख नथुराम गोडसे याने केला असा उल्लेखसुद्धा आहे.
हेही वाचा - सेवाग्राम आश्रम : स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडींंचे ठिकाण
या हत्येचा कटात असलेल्या व्यक्तीला सुरुवातीला अटक करण्यात आली तेव्हा गाडीचा टायर पंचर करून रोखण्यासाठी चाकू आणला असल्याचे त्याने संगीतले होते. मात्र, तपासात पुढे हा हत्येचा प्रयत्न होता आणि तो पोलिसांच्या सतर्कतेने अपयशी ठरला असल्याची नोंद इतिहासात पाहायला मिळते.
हेही वाचा - बापू आणि बुवा...स्वातंत्र्य लढ्यातील मैत्रीपूर्ण साधर्म्य