ETV Bharat / state

दुष्काळामुळे लग्नकार्याला ब्रेक..! म्हणून गावकऱ्यांनी लावले बाहुला-बाहुलीचे लग्न - सोहळा

दुष्काळाने अर्थकारण बिघडल्याने गावात एकही लग्न सोहळा झाला नाही. त्यामुळे समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ गावातील नागरिकांनी नामी शक्कल लढवित गावकऱ्यांनी चक्क पारंपारिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात बाहुला-बाहुलीचे लग्न लावून दिले.

गावकऱयांनी बाहुला बाहुलीचे लग्न लावले
author img

By

Published : Jun 21, 2019, 9:53 PM IST

वर्धा - यंदा सर्वांनाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. दुष्काळामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. परिणामी गावात लग्नकार्यांना ब्रेक लागला. गावात वधू वर असतानाही केवळ आर्थिक अडचणीमुळे लग्नकार्य होऊ शकत नाही. त्यामुळे समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ गावातील नागरिकांनी नामी शक्कल लढवली आहे. गावकऱ्यांनी चक्क पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात बाहुला-बाहुलीचे लग्न लावून दिल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनत आहे.

बाहुला बाहुलीच्या लग्नाची वरात

शिवनफळ गावात 22 युवक-युवती लग्नाचे आहेत. पण दुष्काळाने अर्थकारण बिघडल्याने गावात लग्न सोहळा झाला नाही. कारण शेतकऱ्यांना यावर्षी उत्पन्नच झाल नाही. त्यामुळे घरच्या लग्न कार्यांना थांबा दिला. मागील अनेक वर्षांत प्रथमच असा अनुभव गावकऱयांना आला. गावात किमान एक तरी लग्न व्हायलाच पाहिजे म्हणून मग बाहुला-बाहुलीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. त्याकरिता लोकवर्गणी गोळा केली. आणि सामूहिक एकोप्यातून कौटुंबीक रितीरिवाजानुसार लग्नसोहळा पार पडला. यावेळी यंदा भरपूर पाऊस होऊ दे आणि धनधान्य पिकू दे तसेच बळीराजाची परिस्थिती सुधारून सर्व मंगलमय होऊ दे असे, देवाकडे साकडे देखील घालण्यात आले.

अडचणी कितीही आल्या तरी एकीच्या बळातून अडचणींवर मात करता येते. हा धडा गावकर्यांनी या लग्नसोहळ्यातून दिला. अशा अडचणीच्या काळात गावात लग्न कार्य आल्यास एकत्र येत विवाह सोहळा पार पडला जाईल, असे मत बबन खोंडे आणि सुधाकर गारघाटे यांनी व्यक्त केला.

असा पार पडला विवाह सोहळा...
गावात लग्नकार्यासाठी धावपळ सुरू आहे. गावातीलच वधू - वर असल्याने नवरदेव आणि नवरीकडे हिरव्या पानांचा मांडव घालून हळदीचा कार्यक्रम झाला. अहेरही झालेत. हळदीसह जोडप्यांच्या आंघोळीचाही कार्यक्रम झाला. नवरदेवाची वाजतगाजत टेम्पोत वरात निघाली. त्यामध्ये लहानमोठे मनसोक्त नाचताहेत. तिकडे वधुमंडपातही लगबग सुरु झाली. आणि भोजनाच्या बेताची तयारी सुरु आहे. ही वरात पाहून तुम्हाला गावातले एखादे मोठे लग्न आहे असे वाटेलही. बाहुल्याला नवरदेवाचा साज तर बाहुलीला नवरीचा साज चढवून गावकऱयांनी व सर्व पाहूण्यांनी अक्षदाही फेकल्या. त्यानंतर सर्व वरातीने भोजनाचा आस्वादही घेतला.

Intro:वर्धा

दुष्काळी स्थितीमुळे गावात बाहुला-बाहुलीचा लग्नसोहळा
- दुष्काळामुळं आर्थिक गणित बिघडून गावातील लग्न कार्यांनाच लागला ब्रेक
- गावातील भीषणता मांडली विवाह सोहळ्यातुन

यंदा सर्वांनाच दुष्काळाच्या झळा सर्वत्र सोसाव्या लागत आहे. दुष्काळामुळं आर्थिक गणित बिघडले परिणामी गावात लग्नकार्यांना ब्रेक लागला. गावात वधू वर असतानाही केवळ आर्थिक अडचणीमुळे लग्नकार्य होऊ शकले नाही. ज्याप्रमाणे सामूहिक रित्या चक्क बाहुला-बाहुलीचाच लग्न पार पडला, त्याच पद्धतीने इतर विवाह पार पाडू असा संदेश शिवनफळच्या गावकर्यांनी दिला.

हे आहे वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्यातील शिवणफळ गाव....गावात लग्नकार्यासाठी धावपळ सुरू आहे...गावतातीलसिग वधू वर असल्याने नवरदेव आणि नवरीकडे हिरव्या पानांचा मांडव, हळदीचा कार्यक्रम झाला. अहेरही झाला. हळदीसह जोडप्यांच्या आंघोळीचाही कार्यक्रम झाला. नवरदेवाची वाजतगाजत टेम्पोत वरातही निघालीय. त्यामध्ये लहानमोठे मनसोक्त नाचताहेत. तिकडे वधुमंडपीही लगबग आणि भोजनाच्या बेताची तयारी करत आहे. ही वरात, हा कार्यक्रम पाहून तुम्हाला गावातलं एखादं मोठं लग्न आहे असं वाटेलंही. पण, नाही गावात बाहुला-बाहुलीचे लग्न सोहळा रंगला आहे होय हा लग्न सोहळा बाहुला बहुलीनचाच आहे. बाहुल्याला नवरदेवाचा साज तर बाहुलीला नवरीचा साज चढवून गावक-यांनी सामूहिकरित्या हे लग्न कार्य केले. त्याला कारणही आहे, सततच्या दुष्काळामुळे आर्थिक गणित बिघडल्याने एकही लग्न झालं नाहीये, म्हणून हा आनंद आणि संदेश देणारा खटाटोप...

शिवनफळ इथ युवक - युवती तसे २२ जण लग्नाचे आहेत. पण, दुष्काळाने अर्थकारण बिघडले...परिणाम गावात या अडचणीत कोणी लग्न सोहळा करण्याची हिम्मतच दाखवली नाही. शेतक-यांच्या घरात पिकलच नाही. त्यामुळे घरच्या लग्न कार्यांना थांबा दिलाय. मागील अनेक वर्षांत प्रथमच असा अनुभव गावक-यांना आलाय. गावात किमान एक तरी लग्न व्हायलाच पाहिजे, म्हणून मग बाहुला-बाहुलीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. त्याकरीता लोकवर्गणी गोळा केली गेलीय. सामूहिक एकोप्यातून कौटुंबिक लग्नाच्या परंपरा रितीरिवाजानुसार पार पाडला.

या सोहळ्यातुन एक धडाही घेतला. अडचणी कितीही आल्या तरी एकीच्या बळातून अडचणींवर मात करत बाहेर पडता येते. हा धडा गावकर्यांनी या लग्नसोहळ्यातून मिळवला. गावात विवाह असल्यास अश्या अडचणी आल्यास एकत्र येत विवाह सोहळा पार पडला जाईल असे मत बबन खोंडे आणि सुधाकर गारघाटे यांनीं केला.

मागील काही वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. यावर्षी तर परिस्थितीत अडचणीत आणखी भरच घातली. गावात लग्नकार्य थांबेपर्यंत परिस्थिती बिघडल्यानं निसर्गाला यावेळी साकडं घातले जात आहे. या संकटातून बाहेर निघत यंदा भरपूर पाऊस होऊन धनधान्य पिकू दे आणि बळीराजाची परिस्थिती सुधारून मंगल कार्य पार पडावी, अशी शुभेच्छा वऱ्हाडी म्हणून आलेल्या गावकऱ्यांन व्यक्त केली.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.