वर्धा - लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरवात झाली आहे. १ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा वर्ध्यात होणार आहे. यासाठी भाजपच्या वतीने जय्यत तय्यारी करण्यात आली. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्वावलंबी मैदानावर सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून २०१४ मध्ये याच स्वावलंबी मैदानावर सभा घेतली होती. मात्र, यावेळी देशाचे पंतप्रधान असल्याने या सभेला विशेष महत्व असणार आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा प्रचारार्थ हे सभा घेण्यात येणार आहे. यावेळी सभेला गर्दी करण्याची जवाबदारी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर आहे.
सभास्थळी जवळपास १ लाख लोक येतील, असे सांगितले जात असले तरी, ७० ते ८० हजार लोक येण्याची शक्यता आहे. रामदास तडस यांच्यासाठी ही सभा महत्वाची ठरणार आहे. वर्धा जिल्हा हा काँग्रेसचा गड राहिला आहे. त्यामुळे या सभेत काँग्रेसवर टीका करणार का ? की विकासाच्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.