वर्धा - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे. मात्र, आज जिल्ह्यातील तापमान शनिवारच्या तापमानापेक्षा कमी होते. आजचे तापमान ४६ अंशावरून खाली येत ४५.७ अंशावर नोंदवले गेले.
तापमानात कमी येण्याबरोबरच आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील वातावरणात बदल झाला. आभाळ भरून आल्यामुळे आकाशात काळोख तयार होऊन जोरदार हवा सुटली होती. त्यामुळे नागरिकांना या कडक उन्हापासून थोडा काळ सुटका मिळाली आणि थंडाव्याची अनुभूती आली.
जिल्ह्यात शनिवारी ४६ अंश तापमानाची नोंद झाली. मात्र, आज हे तापमानात ०.३ अंशाने खाली आले. त्यामुळे पुढील काही दिवसात हे उतरलेले तापमान आणखी खाली उतरते की वाढते हे पाहावे लागणार आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात रखरखत्या उन्हाने आणि उष्ण लाटांनी नागरिकांचे जीवन हैराण झाले आहे.