ETV Bharat / state

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या धर्तीवर लोकांचा प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी दरवाज्यात मांडला टेबल - coronavirus death toll

जिल्हाधिकारी कार्यलायत मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यामुळे होणारी गर्दी आणि लोकांचा प्रत्यक्ष संपर्क वाढतो. शिवाय लोकांनी घरातच राहावे असे आवाहन केले असताना लोक कामानिमित्त घराबाहेर पडतात. यामुळे ३२ मार्चपर्यंत थेट भेट न घेता काही तक्रारी किंवा कागदपत्रे द्यायचे असल्यास मुख्य दारावर आवाक-जावकला द्यावे असे सांगण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना

author img

By

Published : Mar 19, 2020, 12:21 PM IST

वर्धा - सध्या कोरोनामुळे जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जमावबंदी असल्याने यासह कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दारावर आवक जावक टेबल ठेवण्यात आला. जेणेकरुन नागरिकांनाच प्रत्यक्ष संपर्क कमीत कमी लोकांशी यावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना

जिल्हाधिकारी कार्यलायत मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यामुळे होणारी गर्दी आणि लोकांचा प्रत्यक्ष संपर्क वाढतो. शिवाय लोकांनी घरातच राहावे असे आवाहन केले असतांना लोक कामानिमित्त घराबाहेर पडतात. यामुळे ३२ मार्चपर्यंत थेट भेट न घेता काहीं तक्रारी किंवा कागदपत्र द्यायचे असल्यास मुख्य दारावर आवाज-जावकला द्यावे, असे सांगण्यात येत आहे.

पाहिल्या दिवशी गर्दी आणि गोंधळ

लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन असतानाही नागरिक जिल्हाधिकारी कार्यलयाच्या गेटवर पोहचले. यावेळी प्रत्यक्ष काम असल्यास फोनवर संपर्क करावा, कागदपत्र द्यायचे असल्यास येथे द्यावे, असे नियुक्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्याने काही वेळ गोंधळ झाला होता. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी स्वतः येऊन नागरिकांना इथे आल्यास काय अडचणी उद्भऊ शकेल हे समजावून सांगितले. लोकांनी गर्दी करण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीने तक्रारी कराव्यात, त्याचे निराकरण केले जाईल. लोकांनी गर्दी टाळल्यास कायद्याचे पालन होईल आणि कोरोना विषाणूला रोखथाम करण्यास उपाययोजनासुद्धा करण्यास सहकार्य लाभेल असे सांगितले.

फोननंबरची यादी लावाण्याच्या सूचना

यावेळी नागरिकांना कार्यालयाच्या आतमध्ये जाऊ न दिल्याने प्रत्यक्ष संपर्क न करता फोन ईमेल, यासारख्या पर्यायाचा अवलंब करावा असे सांगण्यात आले. तसेच महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या दूरध्वनीची यादी लावावी, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा - कोरोनाचा प्रभाव: सेवाग्राम आश्रम परिसरातील पर्यटकांची संख्या रोडावली

हेही वाचा - वर्ध्यात अवकाळी पावसाची बॅटिंग, विद्युत पुरवठाही खंडित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.