ETV Bharat / state

महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर, सरकारने श्वेतपत्रिका काढावी - सुप्रिया सुळे - वर्धा येथील मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय शिक्षण अधिवेशनात सुप्रिया सुळे

महाराष्ट्रावर जो कर्जाचा डोंगर आहे, त्याची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. त्यातून महाराष्ट्राची नेमकी काय परिस्थिती आहे, ते पुढे येईल. त्यातूनच पेन्शन योजना कशा पद्धतीने दिली जाऊ शकेल, याचा व्यापक अभ्यास झाला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

State-level educational convention of the Principal at wardha
वर्ध्यात सावंगी मेघे येथे मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन
author img

By

Published : Dec 14, 2019, 7:48 PM IST

Updated : Dec 14, 2019, 11:40 PM IST

वर्धा - जुन्या पेन्शन योजनेची मागणी रास्त आहे. आपण उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतरांनाही विनंती केली होती की, महाराष्ट्रावर जो कर्जाचा डोंगर आहे, त्याची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. त्यातून महाराष्ट्राची नेमकी काय परिस्थिती आहे, ते पुढे येईल. त्यातूनच पेन्शन योजना कशा पद्धतीने दिली जाऊ शकेल, याचा व्यापक अभ्यास झाला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. वर्ध्यातील सावंगी (मेघे) येथे दत्ता मेघे सभागृहात मुख्याध्यापकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देशाच्या परिस्थितीसोबतच शैक्षणिक परिस्थितीविषयी भाष्य केले.

खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रीया

हेही वाचा... तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता ? शिवसेनेचा मोदींना सवाल

विरोधात भाषण करणारे सगळे काँग्रेसच्या शाळेत शिकून मोठे झाले

देशामध्ये आज ज्या वाईट गोष्टी झाल्यात, त्या आमच्या किंवा काँग्रेसमुळेच झाल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. पण, लोकसभेत जेव्हा उभे राहते, तेव्हा नेहमी एक गोष्ट म्हणते की, आमच्या विरोधात जेवढे भाषण करताना ते सगळे काँग्रेसच्या शाळेत शिकून मोठे झालेत. हे वास्तव या देशाचे आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून विरोधकांना चिमटा काढला. तसेच आज कोणी कोणत्याही पक्षात असला तरी, त्याचा 'ओरिजनल डीएनए' काँग्रेसचाच असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राजकारणात महाराष्ट्रात जो सर्वात जास्त संघर्ष अनुभवला तो माझ्या म्हणजेच पवार कुटुंबीयांनी अनुभवला आहे. या वयातही 52 वर्ष एकसारखे निवडून येणारे माझे वडील शरद पवार असल्याचा उल्लेख सुळे यांनी केला.

हेही वाचा... महाराष्ट्रात नवा नागरिकत्व कायद्याबाबत सरकारसमोर पेच.. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

शिक्षणाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शालेय पोषण आहाराची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. ते शाळेचे प्रमुख आहेत. हे जबाबदारीचे काम आहे. यामुळे ते तुम्ही नाही करायचे, मग कोण करणार, ते सांगा? असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. येत्या दोन दिवसात अधिवेशनाच्या माध्यमातून त्यावर दिशा देणारे अहवाल तयार करावे, त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्या यावेळी म्हणाल्या.

वर्ध्यात सावंगी (मेघे) येथे मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन

देशात जे वातावरण झाले आहे ते दुर्दैवी

ईशान्य भारतात जी अस्वस्थता दिसते, काश्मीरातही तशीच परिस्थिती आहे. त्यात शांतीदूत अशी पत्रिका काढण्यात आली. हे संस्कार महात्मा गांधी आणि विनोबांमुळे मिळाले याचे कौतुक आजच्या परिस्थिती पाहता झालेच पाहिजे. ज्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र घडविला त्यांचा विसर पडतोय. यामुळे त्यांच्या बद्दल पुढच्या पिढीला कळावे, यासाठी आपण येत्या काळात प्रयत्न करणार आहे. तसेच बाबासाहेब आंबडेकर यांनी दिलेली राज्यघटना सुध्दा कळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा... मंत्रिपद घेवून भगवानगडावर या; नामदेव महाराज शास्त्रींचे धनंजय मुंडेंना निमंत्रण

Intro:mh_war_adhiveshan_supriya_byte_7204321

महाराष्ट्रावरील कर्जाच्या डोंगर असलेल्या परिस्थितीवर सरकारने श्वेतपत्रिका काढावी - खासदार सुप्रिया सुळे

वर्धा- जुनी पेन्शन योजनेची मागणी रास्त आहे. मी उद्धव साहेब, दादांना आणि सगळ्यांना विनंती केली होती की, महाराष्ट्रावर जो कर्जाचा डोंगर आहे, त्याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे. त्यातून महाराष्ट्राची नेमकी काय
परिस्थिती आहे. हे पुढे येईल, त्यातून पेंशन कश्या पद्धतीने दिली जाऊ शकेल, की टप्प्याटप्प्याने करता येईल. याचा व्यापक अभ्यास झाला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणत भाजपने कर्जाचे डोंगर

त्या वर्ध्याच्या सावंगी (मेघे) इथं दत्ता मेघे सभागृहात
मुख्याध्यापकांचं दोन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचं उद्घाटन आज झाले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी देशाच्या परिस्थितीसोबतच शैक्षणिक परिस्थितीविषयी भाष्य केले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष दीपक डोंदल, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार पंकज भोयर, विक्रम काळे, नागो गाणार, कपील पाटील आदी उपिस्थत होते.

- विरोधात भाषण करणारे सगळे काँग्रेसच्या शाळेत शिकून मोठे झाले

आज देशामध्ये ज्या वाईट गोष्टी झाल्यात, त्या आमच्या किंवा काँग्रेसमुळेच झाल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. पण, लोकसभेत जेव्हा उभे राहते तेव्हा नेहमी एक गोष्ट म्हणते, की आमच्या विरोधात जेवढे भाषण करताना ना ते सगळे काँग्रेसच्या शाळेत शिकून मोठे झालेत, हे वास्तव या देशाचे आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून खोचट चिमटा काढला.

तसेच आज कुणी कोणत्याही पक्षात असला तरी त्याचा ओरीजीनल डीएनए काँग्रेसचा असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. राजकारणात महाराष्ट्रात जो सर्वात जास्त संघर्ष अनुभवला तो माझ्या म्हणजेच पवार कुटुंबियांनी अनुभवला आहे. या वयातही शरद पवार यांची धडपड मांडताना 52 वर्ष एकसारखे निवडून येणारे माझे वडील असल्याचा उल्लेख केला.

शिक्षकणाचे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. शालेय पोषण आहाराची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. ते शाळेचे प्रमुख आहे. हे जवाबदारीचे काम आहे. यामुळे ते तुम्ही नाही करायचे मग कोणी करायचे. ते सांगा येत्या दोन द8वसात अधिवेशनाच्या माध्यमातून त्यावर दिशा देणारे अहवाल तयार करा मी त्यासाठी प्रयत्न करते अश्या त्या म्हणालयात.

देशात जे वातावरण झालं आहे ते दुर्दैवी आहे.
नॉर्थ इस्टमध्ये जी अस्वस्थता दिसते, काश्मिरातही तशीच परिस्थिती आहे. त्यात शांतीदुत अशी पत्रीका काढण्यात आली. हे संस्कार महात्मा गांधी आणि विनोबांमुळे मिळाले याचे कौतुक आजच्या परिस्थिती पाहता झालेच पाहिजे. ज्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र घडविला त्यांचा विसर पडतोय. यामुळे त्याच्या बद्दल पुढच्या पिढीला कळावे यासाठी मी येत्या काळात प्रयत्न करणार. तसेच बाबासाहेब आंबडेकर यांनी दिलेली राज्यघटना सुध्दा कळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याच्याही त्या म्हणालायत. यासश शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल अश्याही त्या म्हणल्यात.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 11:40 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.