वर्धा- महिलांचा सन्मान ही भावना समाजात रुजली पाहिजे. हा विचार घेऊन मी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. उपोषणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. ते वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आले असता, वर्ध्यातील जळीतकांड प्रकरणावर बोलत होते.
हेही वाचा- संतापजनक ! चंद्रपूरात आजोबाकडून सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण
हिंगणघाट येथील तरुणीवर झालेला पेट्रोल हल्ला हा दुर्दैवी आहे. ती पीडित मुलगी जीवंत राहावी आणि पुढील आयुष्य तिला सन्मानाने जगता यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, कोणीही कायदा हाती घेऊ नये, असेही सुनील केदार यांनी सांगितले.