ETV Bharat / state

'काँग्रेस नेत्यांची हुशारी बघा...! शेतीतून 'इनकम' दाखवून 'टॅक्स' वाचवतात' - सुधीर मुनगंटीवार शेतकरी संमेलन

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला काँग्रसकडून होत असलेल्या विरोधावरून सडकून टीका केली आहे. काँग्रेसवाल्यांनी कधीही शेतकरी हित पाहिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

्ोेैि
शेतीतून 'इनकम' दाखवून 'टॅक्स' वाचवतात
author img

By

Published : Jan 6, 2021, 6:28 AM IST

Updated : Jan 6, 2021, 7:18 AM IST

वर्धा -कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. 'काँग्रेसवाले शेती हा फायद्याचा धंदा नाही म्हणतात. त्यांनी शेतीउत्पन्नावर टॅक्स द्यावा लागणार नाही असे कायदे केले. मात्र, शेतीत उत्पन्नच निघत नाहीतर ईनकम टॅक्स कुठून भरणार? असा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे. शेती घाट्याचा धंदा असला तरी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतीतून ईनकम दाखवू-दाखवून इनकमटॅक्स मात्र वाचवल्याची हुशारी केली. परंतु काँग्रेसने कधी शेतकऱ्यांचा विचार केला नसल्याची टीकाही मुनगंटीवार यांनी केली आहे.

काँग्रेस नेत्याची हुशारी बघा...! शेतीतून 'इनकम' दाखवून 'टॅक्स' वाचवतात
सुधीर मुनगंटीवार वर्ध्याच्या देवळी येथील खासदार रामदास तडस इनडोअर स्टेडियमवर आयोजित शेतकरी संमेलनात बोलत होते. यावेळी मंचावर खासदार रामदास तडस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार दादाराव केचे, डॉ पंकज भोयर, समीर कुणावर उपस्थित होते. यावेळी दिव्यांगांना दुचाकीचे वितरण करण्यात आले.
दिव्यांगांना दुचाकीचे वितरण
दिव्यांगांना दुचाकीचे वितरण

खोटं बोल पण ठरवून बोल-

यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकरी धोरण शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे म्हणत काँग्रेस शेतकरी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांना भडकवण्याचा काम करत असल्याचा आरोप केला. 'सी' फॉर कोरोनाची संकट मिटून जाईल पण दोन 'सी' चे संकट अधिक महत्त्वाचे आहे. एक म्हणजे सी फॉर चायना, ज्याला भारताच्या प्रगतीची चिंता वाढली आहे. पण मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. दुसरा चिंता असणारा 'सी' म्हणजे काँग्रेस. त्यांनी खोटे बोल पण रेटून बोल या म्हणीला नवीन स्टाईलने आणले आहे, खोटं बोल पण ठरवून बोल, असा टोलाही मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला. काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना असे सांगतात, की मोदी सरकारने केलेले कायदे जसे काही शेतकऱ्यांवरचे शेवटचे संकट आहे, असेही मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले आहे.

राहुल गांधीवर साधला निशाणा-

जेव्हा आमच्या देशातील नेते शेतकऱ्याचे आंदोलन सोडून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुसऱ्या देशात जातात, त्या देशातील शेतकरी मात्र वन्य श्वापदाची चिंता न करता या काम करतो. लोकांना नाराज करून मोदीजी काही जिंकणार नाहीत. मात्र, एका पार्टीच्या नेत्याने परिवारासाठी देश सोडला आणि दुसरीकडे देशासाठी परिवार सोडणाऱ्या मोदीजीवर आपण शिंतोडे उडवत आहोत, असे म्हणत मुनगंटीवारांनी यावेळी गांधी घराण्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांसठी आणलेले हे कायदे शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन बदल घडवून आणण्यासाठी केले असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमा प्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी या शेतकरी संमेलनात सहभागी झाले होते. यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ शिरीष गोडे, प्रवक्ते सुधीर दिवे, तसेच राजेश बकाने, सुनील गफाट, मिलिंद भेंडे, यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Jan 6, 2021, 7:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.