ETV Bharat / state

वडिलांनी आणले पेढे, पण समाधानकारक गुण न मिळाल्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थिनीची आत्महत्या - HSC

गेल्या काही काळात विद्यार्थी केवळ कमी गुण मिळाल्याने कठोर पाऊले उचलताना दिसून येत आहेत. देवळी तालुक्यातील अडेगाव येथील एका विद्यार्थिनीने इयत्ता बारावीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, विज्ञान शाखेत मिळाले 55 टक्के गुण
author img

By

Published : May 29, 2019, 7:17 PM IST

Updated : May 29, 2019, 9:14 PM IST

वर्धा - गेल्या काही काळात विद्यार्थी केवळ कमी गुण मिळाल्याने कठोर पाऊले उचलताना दिसून येत आहेत. देवळी तालुक्यातील अडेगाव येथील एका विद्यार्थिनीने इयत्ता बारावीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरात कोणी नसताना साडीने गळफास घेऊन मुलीने आत्महत्या केली आहे. पूजा भिसे, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

पूजा ही देवळीच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. मंगळवारी बारावीचा ऑनलाईन निकाल असल्याने तिला निकालाची उत्सुकता होती. मात्र, ऑनलाईन निकाल बघितल्यानंतर 55 टक्के गुण मिळाल्याने पूजाने आत्महत्या केली. तिला कोणतीही शिकवणी न लावता 55 टक्के गुण मिळाले होते. मुलगी पास झाली म्हणून तिचे कौतुक करण्यासाठी वडिल विजय भिसे पेढे घेऊन घरी आले होते. मात्र, त्यावेळी त्यांना पूजाने आत्महत्या केल्याचे समजले.

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, विज्ञान शाखेत मिळाले 55 टक्के गुण

पूजा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने केलेल्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शालेय जीवनातील गुण, यश-अपयश हा आयुष्याच्या परीक्षेचा निकाल नाही. त्यामुळे कोणतेही टोकाचे निर्णय घेताना आपले आई- वडील कुटुंबीय यांचा विचार करावा. त्याबरोबरच पालकांनीसुद्धा पाल्यांना विश्वासात घेऊन समजून घेण्याची गरज असल्याचे पूजाच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

Intro:mh_war_vidyarthinichi_atmhatya_vis1_7204321

मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे

- शिकवणी न लावताच मिळविले होते गुण

वर्धा - गेल्या काही काळात विद्यार्थी केवळ कमी गुण मिळाल्याने कठोर पाऊले उचलताना दिसून येत आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील अडेगाव येथे बारावीत कमी गुण मिळाल्यास टोकच पाऊल उचलले. घरात कोणी नसतांना साडीने गळफास घेत आत्महत्या केली. पूजा भिसे अस विद्यार्थिनीचे नाव आहे.

पूजा ही देवळीच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. बारावीचा निकाल असल्याने तिलाही उत्सूकता होती. तिने निकाल लागल्याचे कळताच ऑनलाईन निकाल बघितला. बारावीत पूजाला ५५ टक्के गुण मिळालेत. कोणतीही शिकवणी न लावता
पूजाने हे यश मिळवले होते. मुलीचे कौतूक म्हणून वडिल विजय भिसे घरी पेढे
घेऊन आले. पण, सायंकाळच्या सुमारास पूजानने घरीच गळफास घेऊन आत्महत्या
केली. अन वडिलांना बातमी कळताच पास झाल्याचा आनंद केव्हा दु:खात बदलला काही कळलेच नाही.

पूजा लहान पणापासून अभ्यासात हुशार होती. स्वतःच्या जिद्दीने विज्ञान शाखेत कुठलीही शिकवणी वर्ग न लावता पास झाली होती. आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. केवळ कमी गुण मिळाल्यानं आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलण निश्चितच सर्वांच्या मनाला चटका लावणारे आहे.

शालेय जीवनातील गुण, यश अपयश हे आयुष्याच्या परीक्षेचा निकाल नाही. कुठलेही निर्णय घेतांना आपल्या आई वडील कुटुंबीय याचा विचार करावा. परीक्षेतील अपयश किंवा कमी गुण हे तुमच्या आयुष्याला अपयशी ठरवू शकत नाही. त्यामुळे पालकांनी सुद्धा हे समजून घेत पाल्याना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे पूजाचे प्राथमिक शाळेचे शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलतांना संगीतले.
Body:पराग ढोबळे,वर्धाConclusion:
Last Updated : May 29, 2019, 9:14 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.