ETV Bharat / state

Wardha News: 'पवन'ची जिद्द त्याला शिकायला प्रोत्साहन देते; एका होतकरू दिव्यांग विद्यार्थ्याची कहाणी

वर्धा जिल्ह्यात असलेल्या तळेगाव श्यामजी पंत येथील मॉडेल हायस्कूल येथे वर्ग दहाव्या वर्गामध्ये शिकत असलेला पवन प्रमोद दविले (वय 16) वर्ष या मुलाची ही कहाणी आहे. पवन जन्मापासून दिव्यांग आहे. त्याचे दिव्यांगत्व हे 75 टक्के आहे. त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

Wardha News
पवन प्रमोद दविलेची शिक्षणासाठी धडपड
author img

By

Published : Feb 19, 2023, 2:07 PM IST

वर्धा : पवन दहाव्या वर्गात शिकतो. त्याच्या कुटूंबात आई, भाऊ आहे. मात्र त्याचे बाबा नाहीत, पवन 75 टक्के दिव्यांग आहे. पण तरीही पवनने शिक्षणाची जिद्द व चिकाटी सोडली नाही. तो रोज शाळेमध्ये येतो, न चुकता येतो. त्याला चालता येत नाही, लिहिता फारसं येत नाही. परंतु त्याला लिहिण्यासाठी त्याला कोणतीही वस्तू देण्यासाठी त्याचे मित्र त्याला खूप जास्त मदत करतात. त्याला घरून व्हीलचेअरवरून शाळेमध्ये आणतात, शाळेमध्ये सुद्धा त्याला कुठेही घेऊन जायचे असले, तर त्याला मित्र सारंग टर्के हा खूप मदत करतो.

सारंग करतो पवनला मदत : सारंग पवनला कुठेही घेऊन जातो. त्याला वॉशरूमला घेऊन जाण्यासाठी तो त्याला उचलून घेऊन जातो. अगदी लहान मुलासारखे तो त्याची काळजी करतो. पवनचे वडील हे पवन सहा महिन्याचा असताना त्यांनी आत्महत्या केली होती. त्याच्या आईचे सांगण्यावरून पवनच्या वडिलांना ब्रेनचा त्रास होता. त्याच तासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी पवन सहा महिन्याचा होता व त्याचा मोठा भाऊ उदय हा अडीच वर्षाचा होता. मोठ्या कष्टाने त्याच्या आईने दोघांनाही वाढवले. आता पवनचा मोठा भाऊ हा आयटीआय करत आहे. त्याची आई ही मजुरी काम करते. हे सर्व कुटुंब त्याच्या आजोबाच्या घरी राहते. त्याचे आजोबा ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी आहे.

पवन एक उत्कृष्ट खेळाडू : पवनला पुढे शिकून ग्रॅज्युएशन करून देश सेवा करायची असल्याचे तो सांगतो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पवनला खेळण्यातही खूप रस आहे. तो क्रिकेट, बॅडमिंटन अतिशय उत्कृष्टपणे खेळतो. व्हीलचेअरवरून सुद्धा तो खेळतो. पवन एकदा दिल्लीला सुद्धा जाऊन आलेला आहे. त्याला बोर्डातर्फे एक विद्यार्थी लिहायला सुद्धा मिळालेला आहे, ती वर्ग नववीची विद्यार्थी आहे. शाळेमध्ये पवनची सर्व विद्यार्थी काळजी घेतात, त्याला काही लागले तर लागलीच त्याला सगळे मदत करतात.

मोठा अधिकारी व्हायचे स्वप्न : पवनच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा पवन हा नेमक्या 6 महिन्याचा होता. त्याच्या वडीलांना ब्रेन संबंधीत त्रास होता. तो असह्य झाल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असे त्यांच्या कुटूंबियांना सांगितले. बाबा गेले तेव्हापासून त्याचा सांभाळ आई व आजोबांनी केला. पवनला काय हवे, काही नाही हे तो हक्काने सगळ्यांना मागतो, त्याला सर्व जण ते देतात. त्याची शिक्षणाप्रति असलेली जिद्द ही वाखाणण्याजोगी आहे. पुढे शिकून त्याला मोठा अधिकारी व्हायचे असल्याचे पवन सांगतो.

हेही वाचा : Maharashtra Politics: प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही बजावला व्हीप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.