वर्धा - महाराष्ट्र असो की केंद्र सरकार असो प्रत्येक योजना प्रत्येक घरात पोहचल्या पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकाला लाभ मिळाला पाहिजे. बाबासाहेबांच्या घटनेनुसार सर्वांना जगण्याचा समान अधिकार आहे. यादेशात विरासत संस्कृती टिकली पाहिजे आणि बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्राच्या आधारावर समाज निर्माण झाला पाहिजे असे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले. अनके वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नागपूरला जावे लागत होते. यामुळे भाजपला निवडून देत मताच्या दानाचे भान राखून वर्धा जिल्हयासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय नव्याने सुरु केले आहे. हे कार्यालय सुरु होण्यासाठी आदिवासी बांधवांचे मोठे योगदान आहे. तसेच आमदार पंकज भोयर यांच्या पाठपुराव्याने हे शक्य झाल्याचे म्हणत त्यांनी कौतूक केले. यापुढेही आदिवासींसाठी शासन सर्वतोपरी काम करेल असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
यावेळी मंचावर खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार पंकज भोयर, आदिवासी विकास अप्पर आयुक्त संदिप राठोड, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सचिन ओम्बासे, नगराध्यक्ष अतुल तराळे उपस्थित होते. समाज कल्याण सभापती नीता गजाम, समुद्रपूर पंचायत समितीच्या सभापती कांचन मडकाम, सरस्वती मडावी, चंद्रकला धुर्वे, जयश्री चौखे, रोशन चौखे, माधुरी मसराम, कैलास उईके, राजु मडावी आणि नागपूरचे प्रकल्प अधिकारी दिंगाबर चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठया संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
हेही वाचा- आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हाती येणार अपयशच - बावनकुळे