वर्धा - पकडलेल्या सापाला दुचाकीवरुन घेऊन जाणे दोन मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने कुठलेही सहित्य न घेता सापाला नेत असताना सर्पमित्रासह त्याच्या दुचाकीस्वार मित्राला सापाने चावल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यात घडली.
जिल्ह्यातील पांढरकवढा शिवारात सोमवारी रात्री साप निघाल्याची माहिती मिळताच सर्पमित्र सागर महाजन आणि त्याचा मित्र राहुल समर्थ हे दोघांनी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही साहित्य न घेता जीवावर बेतून त्याने साप पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्पमित्र सागरच्या अंगठ्याजवळ सापाने चावा घेतला. मात्र, बिनविषारी साप असल्याचा समज झाल्याने त्याने दखल घेतली नाही. पण तो जहाल विषारी मण्यार जातीचा साप असल्याचे सर्पमित्र सांगतात. यानंतर तो साप घेऊन दुचाकीने वर्ध्याकडे येत असताना सापाच्या तोंडाला पकडुन ठेवले असताना हातातून तो सुटला आणि त्याने त्याला पुन्हा चावा घेतला. याचदरम्यान दुचाकी चालवणारा मित्र राहुल यालाही तो चावला असल्याची माहिती आहे. मात्र, उपचार घेण्यात निष्काळजीपणा केल्याने राहुलचा दवाखान्यात नेताना तर, सागरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
निष्काळजीपणा बेतला जिवावर -
सर्पमित्र सागरने दवाखान्यात घरी गेला मात्र, काही वेळातच त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथून सेवाग्रामला हलविण्यात आले. रात्रभर व्हेंटीलेशनवर राहून अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. सागर कुटुंबात तो एकटाच कमावता असल्याने आता त्याचा त्यांचा आधार गेल्याने संपुर्ण कुटुंब उघडल्यावर पडले आहे.
साप ही खेळण्याचे वस्तू नाही....कायद्याचा धाकही नाही...
सध्या अप्रशिक्षित किंवा अनेक जण ऑनलाईन व्हिडिओ पाहून साप पकडण्याचे धाडस करतात. दोन चार साप पकडल्याने ते स्वतःला सर्पमित्र म्हणून मिरवतात. यात ते फोटो सोशल मीडियावर टाकून लक्ष वेधून घेतात. यामुळे सर्पमित्रांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे यावर कायद्याची भीती नसल्याने गल्लोगल्ली सर्पमित्र झाले. यामुळे साप हा खेळण्याचे किंवा साहस दाखवण्याचा विषय नाही योग्य काळजी घेण्याचे आवाहन विदर्भ सर्पिमित्र संघाचे गजेंद्र सुरकार यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले.