वर्धा - सर्वत्र कोरोनाचा कहर असताना दुसऱ्या रुग्णांची चर्चा थांबली आहे. कोरोनासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. पण पावसाळयात डोकं वर काढणाऱ्या डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. यामुळे याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे. मागील 15 दिवसात डेंग्यूच्या 14 संशयितांची नोंद झाली आहे. यात सहा रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे तपासणी अहवालात पुढे आले आहे. कोरोनाच्या काळजीसोबत डेंग्यूसाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोके काढतात. या काळात रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण कोरोनामुळे या आजाराकडे दुर्लक्ष होत आहे. या काळात दूषित पाण्यामुळेही विविध साथीचे आजार पसरतात. त्यामध्ये हिवताप, डेंग्यू, अतिसार आदी आजाराचे रुग्ण पाहायला मिळतात. मागील 15 दिवसात डेंग्यूच्या सहा रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेकडून पाऊले उचलायला सुरुवात झाली आहे.
सर्वत्र कोरोनाकडे लक्ष वेधले असताना यंदा इतर आजारकडे दुर्लक्ष केले जात आहेत. पण पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी उपचार झाल्यास त्यावर निदान होऊ शकतो. पण यासाठी वेळीच तपासणी आणि योग्य निदान होणे गरजेचे आहे. सध्या लोक घरातच राहून घरगुती उपचार करताना दिसून येत आहे. काही रुग्ण हे खाजगी रुग्णालयाकडे धाव घेताना दिसून येत आहे. पण बरेच लोक भीतीपोटी दवाखान्यात जाणे टाळत असल्याचे सुद्धा पुढे येत आहे.
सध्या घरोघरी जाऊन सर्व्हे केला आहे. पाण्यात गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. ड्रायडे पाळावा, घरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचून राहत असेल अशा ठिकाणी स्वछता किंवा कोरडे करणे शक्य नसल्यास गप्पी मासे सोडण्याचे आवाहन केले जात आहे. खासगी रुग्णालयात डेंग्यू संशयीत रुग्ण असल्यास त्यांचे सिरम सॅम्पल पाठविण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जयश्री थोटे यांनी दिली आहे.
एकाएकी ताप डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप चढउतार असणे, भूक कमी होणे, यासारखे लक्षणे दिसल्यास तपासणी करण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय याकडे दुर्लक्ष करणे हे कोरोनाला आमंत्रण किंवा त्यापेक्षा गंभीर परिणामांना पुढे जाण्याची वेळ येऊ अशेल असे वैदकीय तज्ज्ञाकडून सांगितले जात आहे. यामुळे वेळीच वैदकीय उपचार घेण्याचे आवाहन केले जात आहे.
जिल्ह्यात 14 संशयितांपैकी 6 जणांना डेंग्यूची लागण, आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह
पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोके काढतात. या काळात रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण कोरोनामुळे या आजाराकडे दुर्लक्ष होत आहे. या काळात दूषित पाण्यामुळेही विविध साथीचे आजार पसरतात. त्यामध्ये हिवताप, डेंग्यू, अतिसार आदी आजाराचे रुग्ण पाहायला मिळतात. मागील 15 दिवसात डेंग्यूच्या सहा रुग्णांची नोंद झाली आहे.