ETV Bharat / state

'वर्ध्यातील जम्बो कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे' - जम्बो कोविड रुग्णालय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी साधेपणाने आणि नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी ध्वजारोहण केले. तसेच पोलीस विभागाची मानवंदना स्विकारली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत जम्बो कोविड हॉस्पिटल आणि व्यवस्थेचा आढावा मांडला.

'वर्ध्यातील जम्बो कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे'

author img

By

Published : May 1, 2021, 7:03 PM IST

वर्धा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी साधेपणाने आणि नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी ध्वजारोहण केले. तसेच पोलीस विभागाची मानवंदना स्वीकारली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत जम्बो कोविड हॉस्पिटल आणि व्यवस्थेचा आढावा मांडला. यावेळी पत्रकारांशी बोलताना लस पुरवठ्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. लसीचा पूर्ण पैसा राज्यशासन एका चेकवर द्यायला तयार आहे. पण लसी मिळायला हव्यात. राज्याच्या सगळ्या पक्षांच्या लोकांनी तगादा लावल्यास महाराष्ट्राला लसी मिळण्यास अडचण जाणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा
'जम्बो कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव कॅबिनेटपुढे'उत्तम गलवा येथील ऑक्सिजन वापरून जम्बो कोविड केंद्र तयार करण्याची कारवाई झपाट्याने सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या काम पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रस्तावास मान्यता दिली असून प्रस्ताव कॅबिनेट पुढे आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली. 'पूर्ण सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय नवीन सेंटर उभे करणार नाही'

आपल्या जिल्ह्यातील दोन मोठ्या आरोग्य संस्थानी इतर जिल्ह्यातील रुग्णांना सुद्धा या काळात आरोग्य सेवा दिली आहे. चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातील रुग्ण वर्ध्यात भरती होऊन उपचार घेऊन बरे होऊन घरी जातात ही जमेची बाजू आहे. तालुक्याच्या ठिकाणी बेड वाढवण्याची मागणी होत आहे. सामान्य माणसाला आरोग्य सुविधा पुरविणे ही प्राथमिकता आहेच पण ऑक्सिजनसंबंधी अडचण आहे. महाराष्ट्रात रायपूर, ओडिशा आणि इतर राज्यातून ऑक्सिजन येत आहे. ऑक्सिजन उपलब्धता पाहून बेड वाढवण्याचा निर्णय घेऊ, तसेच पूर्ण सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय नवीन सेंटर उभे करणार नाही असेही पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

2 मे पासून सुरू होणार 18 ते 44 वयोगटातील लसीकरणास प्रारंभ
राज्यशासनाने खरेदी केलेल्या 5 हजार लसीचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. त्यातून उद्यापासून जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल. जिल्ह्यात वर्धा येथे गांधी लेप्रसी फाऊंडेशन, ग्रामीण रुग्णालय पुलगाव, ग्रामीण रुग्णालय कारंजा, टाका ग्राउंड उप प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणघाट आणि उपजिल्हा रुग्णालय आर्वी असे 5 केंद्र सुरू करण्यात आले आहेत. उद्या दुपारी दोननंतर लसीकरण सुरू होईल.

हेही वाचा - काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांच्या लसीकरणाचा भार उचलावा - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.