वर्धा - नगर परिषदेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या मागण्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे.
हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन
स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींजीच्या नावाने ओळख असलेल्या जिल्ह्यात अनेक दिवसांपासुन स्वच्छता विभागातील कर्मचारी आंदोलन करत आहे. या आंदोलनात कचरा गोळा करणारे, घंटागाडी चालविणारे, डंम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगार सहभागी झाले होते. आठवड्यातून किमान एक सुट्टी, कामाचे तास आठ, वेळेवर वेत, तसेच कामगारांना संरक्षण किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
किमान वेतन 12 हजाराच्या असतांना कामगारांना केवळ 6 ते 7 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. सुट्टी न देता पुर्ण महिना करवुन घेतल्या जात आहे. अशाप्रकारे कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याच आरोप संभाजी ब्रिगेडचे विदर्भ संघटक तुषार उमाळे यांनी केला. याबद्द्ल वांरवांर तक्रार करुनही नगर परिषद आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.