ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही...

हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रवारी) एका तरुणीला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली. यामध्ये ती तरुण ३५ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. मात्र, आरोपीने थंड डोक्याने या सर्व हल्ल्याची तयारी केली होती, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

हिंगणघाट जळीतकांड
हिंगणघाट जळीतकांड
author img

By

Published : Feb 5, 2020, 11:40 AM IST

वर्धा - हिंगणघाट जळीतकांडाला आता ४८ तास पूर्ण झाले आहेत. पीडितेची प्रकृती गंभीर आहे. त्यात दुसरीकडे पोलीस तापसामध्ये महत्त्वाचे पुरावे समोर येत आहे. ही सर्व घटना अचानक घडली नसून त्याने आधीच थंड डोक्याने सर्व तयारी केली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही...

तिला जाळण्यासाठी त्याने आधीच एक बॉटल कापून ठेवली होती. जेणेकरून ते पेट्रोल तिच्या अंगावर पडावे. त्यानंतर त्याने तिला दुरूनच पेटवता येईल या हेतूने टेंभा देखील तयार केला. सोबत लाईटर, बॅग, त्यामध्ये कपडे हे सर्व साहित्य असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. पोलीस तपासामध्ये हे सर्व साहित्य जप्त करण्याची शक्यता आहे.

त्याने घटना घडल्यानंतर रिमडोह राधानगरी परिसरात जाऊन कपडे बदलले. तसेच हे कपडे जाळण्यासाठी दुसऱ्या लहान बाटलीमध्ये पेट्रोल होते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो एका नातेवाईकाकडे गेला आणि त्याठिकाणी नाश्ता केला. यावेळी त्याला एक फोन आला आणि त्याने ठिकाण सोडण्याचे ठरवले. त्यानंतर तो नागपूरच्या दिशेने रवाना झाला, असेही सूत्रांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर तो नागपूरच्या दिशेने गेला असेल, अशी शंका पोलिसांना होती. तशी माहिती हिंगणघाट उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली होती. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलीस देखील अगोदरच तयारीत होते. त्यानुसार त्याला बुट्टीबोरी परिसरातील एका मंदिरातून अटक करण्यात आल्याचे वर्धा पोलिसांनी सांगितले. साधारण ७.२० वाजता सुरू झालेला हा घटनाक्रम ११.३० वाजेपर्यंत चालला.

Intro:वर्धा
mh_war_situation_wkt_7204321

त्या दिवसातील थंड डोक्याने आरोपीचा महत्वाच्या चार तासातील हा घटनाक्रम....

वर्ध्यातील प्राध्यापिका जाळण्याचा घटनेला आता 48 तास झाले आहे. पोलीस तपासात महत्वाचे पुरावे गोळा करण्याचे कांम सुरू झाले आहे. यात जी महिती पुढे येत आहे यामध्ये तिला जाळण्याचा कट थंड डोक्याने केली असल्याचे गितले जात आहे.

घटनेच्याया दिवशी त्याच थंड डोक्याचे चित्र मिळाले. यात त्याच्याकडून तिला जाळण्याचा उद्देश असताना एक बॉटल होती. त्या बॉटलला अर्धी कापून घेतले होते. जेणेकरुन पेट्रोल तिच्या अंगावर पडावे. ती पेट्रोल ने भिजून जावी. यासह अगोदरच टेम्बा तयार होता जेणेकरून तिला दुरुच पेटवता येईल स्वतःला इजा होणार नाही. कदाचित ज्या लाइटरने हा टेम्बा पेटवला ते लायटर ने आग लावण्यासाठी वापरले तर त्यात आपण जखमी होऊ हे वीकेशला भान होते. यावरून त्याची तय्यारी लक्षात येते.

घटनेच्याया दिवशी इथून निघून रिमडोह राधानगरी परिसरात कपडे बदलले. यासह हे कपडे जाळून टाकण्यासाठी दुसरी छोटी बॉटल त्याने ठेवली होती. ती बॅग यासह त्याचे जोडे, लाईटर कपडे बॅग आदी साहित्य जप्त होणार असल्याचे सांगितले जाते आहे त्याचा दिलेल्या माँहितीवरून पोलीस तपासत काम करत आहे.

यानंतर तो एका नातेवाईक यांच्याकडे कडे तिथे त्याने नाश्ता वगैरे केला. यात एका फोन आल्याने त्याने ठिकाण सोडण्याकगे ठरवले आणि ती नागपूरच्या दिशेने रवाना झाला. यात बुट्टीबोरी शिवारात त्या अटक करण्यात आली.

घटना घडताच तो नागपूर जवळ असल्याने त्या दिशेने जाऊ शकेलं अशी शंका होती. त्याची माहिती हिंगणघाट उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांनी अगोदर संगीतले. यामुळे नागपूर ग्रामीण पोलीस अगोदरच तयायरीत होते. त्यानी लागलीच संशय पाहता एक मंदिरातून अटक वर्धा पोलिसांनी सांगितले. साधारण 7.20 ला सुरु झालेला घटनाक्रम 11 ते 11.30 पर्यंत चालला आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.