वर्धा - जिल्हा सामान्य रुग्णालयातून चक्क रुग्णवाहिका अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यात रुग्णवाहिकेचा चालक 19 फेब्रुवारीला कर्तव्यावर परत आला असताना ही घटना उघडकीस आली. पोलिसात चोरीची घटना नोंद केल्यानंतर शोध घेतला तेव्हा रुग्णवाहिका ही सिद्धार्थ नगर परिसरात मिळून आली. पण, सर्वत्र सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक, पोलीस चौकी रुग्णालयात असताना चोरी होऊच कशी शकते, आणि चोरट्याचा उद्देश तरी काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
हेही वाचा - राज्यातील आमदारांसाठी देशी-विदेशी भाषांची शिकवणी; 22 जूनला होणार लोकसभेच्या उपक्रमाचे उद्घाटन
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एमएसडब्ल्यू वॉर्डासमोर पार्कींगमध्ये रुग्णवाहिका उभी होती. चालकाची १८ जून रोजी ड्युटी संपल्यानंतर तो चाबी ड्रायव्हर रूममध्ये ठेवून घरी निघून गेला. १९ जून रोजी चालक कर्तव्यावर परत आला तेव्हा रुग्णवाहिका न दिसल्याने शोधा शोध, विचारपूस सुरू झाली. यावेळी रुग्णवाहिका चोरीला गेल्याचे कळताच एकच खळबळ उडाली. अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली. यात पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवताच दोन तासात शोध घेतला. शहराच्या सिद्धार्थ नगर परिसरात ही रुग्णवाहिका मिळून आली.
रुग्णवाहिका चोरीचा नेमका उद्देश काय?
जिल्हा समान्य रुग्णालयातून अज्ञात चोरटा चक्क रुग्णवाहिका घेऊन जातो आणि कोणाला लक्षात येत नाही. जेव्हा दुसऱ्या दिवशी चालक येतो तेव्हा हा प्रकार उघडीस येत असले तर नक्कीच प्रकार गंभीर आहे. पण, यात तो चोरटा कोण आणि कुठल्या उद्देशाने ही रुग्णवाहिका चोरून नेली याचा शोध सध्या शहर पोलीस घेत आहे.
हेही वाचा - कारच्या धडकेत दुचाकी भूमिगत गटार योजनेच्या चेंबरमध्ये अडकली, पहा व्हिडिओ..