ETV Bharat / state

वर्धा: बसमधील प्रवाश्यांचे साहित्य चोरणाऱ्या 2 महिला गजाआड

जाम बस स्थानकावर पंकज पावडे हा आपल्या कुटुंबियांसोबत हिंगणघाटला जाण्यासाठी आले होते. बसमध्ये चढत असताना 2 अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पाकीटमधील तब्बल १ लाख ६७ हजाराचे दागिने लंपास केले. याची माहिती कळताच घटनेची तक्रार समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दोन संशयित महिलांना अटक केली.

बसमधील प्रवाश्यांचे साहित्य चोरणाऱ्या दोन महिलाना अटक - समुद्रपूर पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Jun 22, 2019, 12:45 PM IST

Updated : Jun 22, 2019, 6:06 PM IST

वर्धा - समुद्रपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जाम येथील बसस्थानकावर संधीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे प्रगटीकरण शाखेने केली. या महिला अट्टल चोरट्या असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता समुद्रपूर पोलिसांच्या वतीने वर्तवली जात आहे. नन्नु रोहित दुनगव (वय 20) आणि मनीषा दुनगव (वय 19) (रा.नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे.

जाम बस स्थानकावर पंकज पावडे हा आपल्या कुटुंबीयांसोबत हिंगणघाटला जाण्यासाठी आले होते. बसमध्ये चढत असताना २ अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पाकीटमधील तब्बल १ लाख ६७ हजाराचे दागिने लंपास केले. याची माहिती कळताच घटनेची तक्रार समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पुराव्याच्या आधारावर २ संशयित महिलांना अटक केली. नागपूरच्या रिंग रोड टोली रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या नन्नु रोहित दुनगव (वय 20) आणि मनीषा दुनगव (वय 19) दोघींना अटक केली. तपासात गुन्ह्याची कबुली देत पोलिसांनी या महिलांकडून चोरीला गेलेले ६ तोळे ७ ग्राम वजनाचे १ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने जप्त केले.

गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख अरविंद येनूरकर यांना तपासात हिंगणघाट येथील २ चोऱ्या उघडकीस आणण्यात यश आले आहे. आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारवाई एसडीपीओ भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे यांची गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख अरविंद येनूरकर, सहकारी रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे महिला पोलीस कर्मचारी रंजना झिलपे यांनी ही कारवाई पूर्ण केली.

Intro:mh_war_mahila_chor_atak_vis1_7204321

बसमधील प्रवाश्यांचे साहित्य चोरणाऱ्या दोन अटक

- गुन्हे प्रगटीकरण चमुची कारवाई समुद्रपूर पोलिसांची कारवाई

समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जाम येथील बसस्थानकावर संधीचा फायदा घेऊन
महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे प्रगटीकरणं शाखेने करत शिताफीने दोन महिलांना अटक केली आहे. या महिला अट्टल चोरट्या असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता समुद्रपूर पोलिसांच्या वतीने केली जात आहे.नन्नु रोहित दुनगव वय 20 आणि मनीषा दुनगव वय 19 दोघी राहणार नागपूर यांना अटक करण्यात आली आहे.

जाम बस स्थानकावर पंकज पावडे हा आपल्या कुटुंबियांसोबत हिंगणघाट जाण्यासाठी आला होता. बसमध्ये चढत असताना दोन अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पाकीटमधील तब्बल १ लाख ६७ हजाराचे दागिने लंपास केले. याची माहिती कळताच घटनेची तक्रार समुद्रपूर पोलिसात दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दोन संशयित महिलांना अटक केली. नागपूरच्या रिंग रोड टोली रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या नन्नु रोहित दुनगव वय 20 आणि मनीषा दुनगव वय 19 दोघींना अटक केली. तपासात गुन्ह्याची कबुली देत पोलिसांनी या महिलांकडून चोरी गेलेले ६ तोळे ७ ग्राम वजनाचे १लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने जप्त केले.

गुन्हे प्रागटिकरण चमूचे प्रमुख अरविंद येनूरकर यांना तपासत हिंगणघाट येथील दोन चोऱ्यां उघडकीस आणण्यात यश आले आहे. आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारवाई एसडीपीओ भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे यांची गुन्हे प्रगटीकरण चमू प्रमुख अरविंद येनूरकर, सहकारी रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे महिला पोलीस कर्मचारी रंजना झिलपे यांनी ही कारवाई पूर्ण केली.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Jun 22, 2019, 6:06 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.