वर्धा - कोरोनामुळे सर्वत्र थांबून गेल्यासारखे झाले होते. ट्रेन, उद्योग धंदे वाहतूक सगळे काही थांबले. पण यात जवाबदारी वाढली ती आरोग्य व्यवस्थेची. पण प्रसूती ना कोणासाठी थांबल्यात ना थांबणार. कोविड पॉझिटीव्ह असणाऱ्या 85 आईं आणि त्यांच्या बाळांना सुखरूप जग दाखवणाऱ्या वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील खर्याखुर्या आदिशक्तीचे रूप जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून....
सुरवातीला कोरोनाशी दोन हात करताना प्रचंड भीती असल्याचे आरोग्य क्षेत्रात काम करणारे सांगतात. पण आज हे सवयीचे झाले. रोजच चेहऱ्याला असणारा मास्क, फेस शिल्ड, चष्मा, हॅन्डग्लोज आणि सतत धुवावे लागणारे हात सर्वकाही आता सवयीचे झाले असल्याचे डॉ. नेहा गगणे सांगतात. पण या सगळ्यात प्रसूतीचे काम ना थांबले ना थांबणार मग तो कोविड असो की अजून काही.
हे कोरोना काळातील जगच वेगळं होते. कोविड येताच सर्व काही बदलून गेले. पूर्वी सहज कोणालाही तपासता येत होते. पण आता सगळं बदलवून एक चेन तयार झाली. प्रत्येक रुग्ण हा कोविड संशयित म्हणून बघावा लागतोय. यात आता तपासणी करतांना इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी स्वतःत्र व्यवस्था निर्माण झाली आहे. यामुळे प्राथमिक तपासणी आणि निदान करून त्यांना कोविड आणि नॉन कोविड विभागणी केली जात होते.
लॉकडाऊनच्या काळात जवळपास 350 प्रसूती झाल्यात. यात 85 कोरोना बाधित महिलांची यशस्वी प्रसुती करण्यात आली. सामान्य रुग्णासारखे त्यांना तपासल्या जाणे शक्य नाही. यात कोरोना पॉझिटिव्ह असताना काळजी घेऊन करावी लागली. विषेश म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह असताना कोणालाही सोबत राहत येत नाही. यामुळे रुगणावर किंवा आईला कोरोनाचा दडपण कमी करण्यासाठी त्याच्याशी चर्चा करून त्याचा मानसिकरित्या परिस्थितीशी लढा द्यायला तयार करावे लागत असत. यासह येथे आम्हीच त्याचे नातेवाईक होऊन त्याची काळजी घेत होतो. यात बरेच चांगले वाईट अनुभव आल्याचेही शिशु प्रभाग प्रमुख डॉ. पूनम वर्मा सांगतात.
मागील सहा महिन्यात कोणालाही सुट्टी घेता आली नाही. सॅनिटायझरने हाताची सालटं निघाली. कोरोनाचा पीपीई कीट घालून काम करताना खुप त्रास सहन करावा लागला. एवढे करूनही अनेक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आले. यात एखादाच असेल जो पीपीईमध्ये चक्कर येऊन पडला नसेल. यात अनेक जण जमिनीवर कोसळण्याच्या घटना घडल्याचेही डॉ. नेहा गगणे सांगतात. सोबतच घरात जायला मिळत नसत आणि मिळालेच तर त्यातही घरात इतरांपासून अंतर ठेवून राहावे लागत ते फार वेदनादायक असायचे. लहान मुलांची काळजी घेताना भीती वाटे.
आम्हाला कोविड माहीत आहे, पण त्या रुग्णांना नाही....
रुग्णांना सोबत कर्तव्य बजावताना अनेक चांगले वाईट अनुभव आले आहे. सामान्य रुगणाला आम्ही 10 वेळा तपासू पण कोविड रुग्णाला बाबत तसे होऊ शकत नाही. यामुळे त्यांच्या अपेक्षा असायच्या की आम्ही पाच पाच मिनीटांनी तपासले पाहिजे. हेच त्यांना कळत नाही. कारन कोविड काय आहे हे डॉक्टर म्हणून आम्हाला माहीत आहे. पण तसं बे जवाबदार वागलो तर अनेक रुग्ण आमच्या संपर्कात येऊन बाधित होऊ शकेल पण तसे करता येणार नाही. यासाठी दोघांनीही काळजी घेण्याची गरज आहे.
बदल घडवणारा कोरोना काळ
या सर्व अनुभवातून रोज अनुभव येत होता, रोज नवीन शिकत होतो. यामुळे कोरोनाचा काळ शिकवणारा बदल घडवणारा राहिला. जे केले ते कर्तव्य होते असे म्हणणारे अनेक जण भेटले. तर देवदूत ठरले असे म्हणणारे काही लोक भेटले. काहींनी प्रचंड राग व्यक्त केला तर काहींनी नम्रपणे आभार मानले. पण कामात खंड न पाडता रुग्ण सेवा करणाऱ्या कोरोना योद्धा त्या ठरल्याच. सोबतच मातृत्वशक्तीला आधार देणाऱ्या आदिशक्ती देवदूतही त्या ठरल्या.