वर्धा - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीवर तर्क लावले जात आहेत. शिवसेना-भाजपा शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाही, म्हणत सूचक वक्तव्य मुंगटीवार यांनी केले होते. हिंदुत्व हा जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षाला ऐकावा लागेल, असेही वक्तव्य त्यांनी केले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील मुनगंटीवार यांना निराशेने ग्रासले आहे, अशी टीका केली. ते वर्ध्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेस आले होते. त्यावेळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले आहे; जयंत पाटलांचा टोला - jayant patil on mungantiwar
मुनगंटीवारांना निराशेने ग्रासले असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प संकटात सापडलेल्या माणसाला दिलासा देईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच केंद्राच भाजप सरकार महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक देत असल्याचे केंद्रीय अर्थसंकल्पातून सिद्ध झाल्याचेही पाटील म्हणाले.