ETV Bharat / state

दररोज गरीब जनतेचे 67 लाख रूपये विमा कंपनीच्या घशात जातात - नाना पटोले - shivsena

आर्वी येथे काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पार पडली. यावेळी गांधी चौकातील सभेत नाना पटोले बोलत होते. दरम्यान त्यांनी भाजप, शिवसेनेवर जोरदार टीका केली.

दररोज गरीब जनतेचे 67 लाख रूपये विमा कंपनीच्या घशात जातात - नाना पटोले
author img

By

Published : Aug 27, 2019, 7:32 AM IST

वर्धा - आर्वी येथे काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेदरम्यान बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

आर्वी येथे काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पार पडली. यावेळी गांधी चौकातील सभेत नाना पटोले बोलत होते. काँग्रेसच्या वेळेस बसने अपघात झाल्यास ते नुकसान भरपाई देत होतेच. पण यांचे सरकार आले आणि प्रत्येक तिकीटावर 1 रुपया विम्याच्या नावाने कापण्यात आला. दररोज 67 लाख गरीब जनता बसने प्रवास करत असते, त्यांचे हे पैसे एसटी महामंडळाला नाही जात तर, पीक विमा सारख्या योजनेताल गरीब जनतेचे पैसे अंबानी, अदानी व मातोश्रीवर जात आहे. उद्या शिवसेनेचे युवराज आर्वीत येत आहे, त्यांना विचारा गरिबांचे पैसे अदानी, अंबानीच्या विमा कंपनीला का भरत आहे, असे म्हणत पटोले यांनी शिवसेनेवर जोरदार टीका नाना केली. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, चारुलता टोकस, कलावती वाकोडकर, हुकुमचंद आमझरे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, राजेंद्र करवाडे, श्याम पांडे आदी उपस्थित होते.

दररोज गरीब जनतेचे 67 लाख रूपये विमा कंपनीच्या घशात जातात - नाना पटोले

पुढे बोलताना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सरकारचे खाते काढून ते मिसेस फडणवीस यांच्या खासगी बँकेच्या खात्यात गेले. हे खाते जाताच फडणवीस मॅडम बँकेच्या उपाध्यक्ष झाल्या, वनमंत्री 3 वर्षात मोठी झाडे लावल्याचे सांगतात. मग 3 वर्षात सरकारने लावलेल्या झाडांचे सोशल ऑडिट होऊ द्या, किती झाडे जिवंत आहेत, ते कळू द्या असेही पटोले म्हणाले.

कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूर आला, हाहाकार माजला, यात 17 जणांचा बोट उलटून पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला. यांच्याकडे गिरीश महाजन हे जोकर मंत्री आहेत. ते बोटीत गेले आणि 17 जणांचा विषय सुटून यांचाच विषय चर्चेला आला. तसेच निवडून दिलेल्या भाजपच्या आमदार, खासदारांना बोलायचा अधिकार नाही. नागपुरातील ऊर्जामंत्री चिंधीचोरी करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्राने महिलांवर होणाऱ्या अत्याचारात उत्तरप्रदेशलाही माग टाकले, असे पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी विनाअनुदानित शाळांच्या आंदोलक शिक्षकांवर झालेल्या पोलीस लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

लोक आम्हाला विसरले, मुंबईवासी झाले, यांना परवासी करा - नितीन राऊत

यावेळी नितीन राऊत बोलताना म्हणाले, की मुख्यमंत्री नावाचे मुख्यमंत्री असून केवळ घोषणांचा पाऊस पाडतात. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगार असो ते सोडवू शकले नाही असे म्हणतात. त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे काय? असा सवालही त्यांनी केला. विदर्भातील एकाही जिल्ह्यात उद्योग आणला नाही, हे मुख्यमंत्री निकामी आहे. काँग्रेसने राज्य, देशाला खूप काही दिले आहे, विनोबा भावेंनी गरिबांना जमिनी दिल्या. आम्ही लोकांच्या प्रश्नांची यात्रा घेऊन येत आहोत, काँगेस नेते नितीन राऊत म्हणाले. ज्यांना आपल्यासाठी निवडून दिले ते लोक आम्हाला विसरले ते मुंबईवासी झाले, यांना परवासी करा, अशी टीका करताना नितीन राऊत यांची जीभ घसरल्याप्रमाणे झाली.

Intro:वर्धा
दररोज गरीब जनतेचे 67 लाख हे विमा कंपनीच्या घशात जातात- नाना पटोले

या अगोदर सुद्धा बसने अपघात झाल्यास नुकसान भरपाई देत होतेच. पण यांचे सरकार आले प्रत्येक तिकिटावर एक रुपया विम्याच्या नावाने कापण्यात आले. हे पैसे एसटी महामंडळाला नाही चालला. दररोज 67 लाख गरीब जनता बसने प्रवास करतात. पीक विमा योजने सारखे हे गरीब जनतेचे पैसे मातोश्रीवर जात आहे. उद्या शिवसेनेचे युवाराज आर्वीत येत आहे, त्यांना विचार गरिबांचे पैसे अडाणी अंबाणीच्या विमा कंपनीला का भरत आहे असे म्हणत शिवसेनेवर जोरदार टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली.

आर्वी येथे काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पार पडली. यावेळी गांधी चौकातील सभेत नाना पटोले बोलत होते. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, चारुलता टोकस, कलावती वाकोडकर, हुकुमचंद आमझरे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, राजेंद्र करवाडे, श्याम पांडे आदी उपस्थित होते.

# लोक आम्हाला विसरले, मुंबईवासी झाले, यांना

राउतांची जीभ घसरली सध्याच्या परिस्थितीत अघोषित आणीबाणीच चित्र आहे.

मुख्यमंत्री नावाचे मुख्यमंत्री असून केवळ घोषणांचा पाऊस पाडतात. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगार असो ते सोडवू शकले नाही असे म्हणतात त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार आहे काय?असा सवाल केला. विदर्भातील एकाही जिल्ह्यात उद्योग आणला नाही, हे मुख्यमंत्री निकामी आहे. काँग्रेसने राज्य, देशाला खूप काही दिल आहे, विनोबा भावेंनी जमिनी गरिबांना दिल्यात, आम्ही लोकांच्या प्रश्नांची यात्रा घेऊन येत आहोत, काँगेस नेते नितीन राऊत म्हणाले. ज्यांना आपल्यासाठी निवडून दिले ते लोक आम्हाला विसरले ते मुंबईवासी झाले, यांना परवासी करा, अशी टीका करताना नितीन राऊत यांची जीभ घसरल्याप्रमाणे झाली.

यावेळी नाना पटोले यांनीसुद्धा भाजपवर टीकास्त्र सोडले. सरकारचे खाते काढून खाजगी बँकेत मिसेस फडणविस बँकेच्या खात्यात गेले, हे खाते जाताच फडणवीस मॅडम बँकेच्या उपाध्यक्ष झाल्या, वनमंत्री तीन वर्षात मोठी झाड लावल्याच सांगतात. मग तीन वर्षे झाडे लावले त्याचे ऑडिट होऊ द्या. सरकारनं लावलेल्या झाडांचं सोशल ऑडिट होऊ द्या, किती जिवंत आहेत, ते कळू द्या असंही पटोले म्हणाले.

कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूर आला, हाहाकार होता, यांना कोणाचच देणंघेणं नाही. 17 जण बोट उलटून मेले. यांच्याकडे गिरीश महाजन हे जोकर मंत्री आहेत. ते बोटीत गेले आणि 17 जणांचा विषय सुटून यांचाच विषय चर्चेला आला. निवडून दिलेल्या भाजपच्या आमदार, खासदारांना बोलायचा अधिकार नाही. नागपुरातील ऊर्जामंत्री चिंधीचोरी करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रानं महिलांवर अत्याचारात उत्तरप्रदेशलाही माग टाकले, असंही पटोले म्हणालेत. यावेळी त्यांनी विनाअनुदानित शाळांच्या आंदोलक शिक्षकावर पोलीस लाठीहल्ला निषेध व्यक्त केला.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.