ETV Bharat / state

वर्ध्यात सासुरवाडीतील शेतीच्या वाटणीच्या वादावरुन दारूत विषप्रयोग करून साडभावाची हत्या - वर्धा शेतीचा वाद बातमी

मृत मोरेश्वर हा गुरुवारी रात्री दारूची बॉटलमधील दारू पिताच काही क्षणात जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांनी मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी १९ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती.

murder due to dispute over sharing of agriculture in wardha
साडभावाची हत्या
author img

By

Published : Aug 22, 2022, 7:23 AM IST

वर्धा सेलू तालुक्यातील जुनगड येथे साडभावानेच पत्नीच्या बहणीच्या नवऱ्याची सासरच्या शेत जमिनीच्या हिस्सेवाटणीतील वादामुळे चक्क दारूत विषारी औषध टाकून हत्या केल्याचा खुलासा झाला आहे. गुरुवारी यात दारू पिल्याने जमीनीवर कोसळल्याने रुग्णालयात मृत्यू झाला. यात सुरवातीला सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासात हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. मोरेश्वर पिंपळे असे 34 वर्षीय मृताचे नाव आहे. तर संदीप रामदेव पिंपळे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. यात मारेकऱ्यांना अमरावती जिल्ह्यातील दोघांनी विषारी औषध दिल्याने विजयसिंग चितोडीया, राजकुमार चितोडीया यांनाही अटक करण्यात आली.

डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले मृत मोरेश्वर हा गुरुवारी रात्री दारूची बॉटलमधील दारू पिताच काही क्षणात जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांनी मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी १९ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. सेलूचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी मोरेश्वरच्या घरी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना दारूच्या बॉटलमधून उग्र वास येत असून त्याचा झाकणावर छिद्र दिसून आल्याने संशय बळावला.

दारूची बॉटल घरासमोर मिळाली पोलिसांनी तपास केला असतांना कुटुंबियाशी विचारपूस केली तेव्हा दारूची बॉटल घरासमोर मिळाल्याचे समोर आले. तसेच जेव्हा घातपाताचा संशय आला. तेव्हा मृतक मोरेश्वरच्या पत्नीचे वडील मरण पावल्याने त्यांच्या पाच एकर शेतीचा वाद उभा झाला. यातून दोघांमध्ये वाद होता. सहा महिन्यापूर्वीपासून तो मारण्याचा कट रचत होता. यातून त्यांने हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात दिले.

विषारी औषध देणारे दोघेही अटकेत या प्रकरणात विषप्रयोग करण्यासाठी संदीप पिंपळे हा काही आयुर्वेदिक औषधी देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील विजयसिंग चितोडीया, राजकुमार चितोडीया यांच्या संपर्कात होता. त्यांच्यापासून त्याने आगुर्वेदीक औषध घेतले होते. यांच्याकडून चांगली किंमत देऊन विषारी औषध आणले. हेच विषारी औषध मोरेश्वरच्या दारू पिण्याची सवय लक्षात ठेवून मारण्याचा कट रचल्याने हत्येचा कट, यासह हत्या करण्याच्या प्रकरणात त्याला आणि विषारी औषध देणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.