वर्धा - उत्तरप्रदेशात आदिवासींच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी ताबा करणाऱ्यांचा विरोध केल्यामुळे आदिवासी समुदायावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला. या पिडीत आदिवासी कुटुंबीयांच्या सांत्वनाकरीता काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी जात होत्या. त्यांना गावात जाऊ न देता, पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीने वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींच्या नावाने निवेदन देण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशातील आदिवासी हत्याकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यात काँग्रेसचे धरणे आंदोलन
उत्तर प्रदेशातील आदिवासींच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सोबतच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या अटकेचाही निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले असून वर्ध्यासोबतच हिंगणघाट येथेही काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
वर्धा - उत्तरप्रदेशात आदिवासींच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी ताबा करणाऱ्यांचा विरोध केल्यामुळे आदिवासी समुदायावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला. या पिडीत आदिवासी कुटुंबीयांच्या सांत्वनाकरीता काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी जात होत्या. त्यांना गावात जाऊ न देता, पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीने वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींच्या नावाने निवेदन देण्यात आले आहे.
- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींच्या अटकेचाही निषेध
- जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले निवेदन
- हिंगणघाटातही काँग्रेसच्या वतीने दिले निवेदन
वर्धा - उत्तरप्रदेशात आदिवासींच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा घेणाऱ्यांचा विरोध करणायत आला. यावेळी आदिवासीं समुद्यावर गोळीबार करण्यात आला. यात १० जणांचा नरसंहार करण्यात आला. या पिडीत आदिवासींचा कुटुंबीयांच्या सांत्वनाकरीता काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी जात होत्या. त्यांना मात्र गावात जाऊ देण्यात आले नाही. माज्जाव करत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीने धरणे देण्यात आले. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींचा नावाने निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील आदिवासी बंधावासोबत जमिनीच्या वादातून झालेला हत्याकांडचा विरोध करण्यात येत आहे. या पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असतांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वडेरा यांना रोखण्यात आले. पोलिसांनी मज्जाव करत त्याना अटक करून ठेवल्याने याचे तीव्र पडसाद आज जिल्ह्यात दिसले. पिडीत कुटुंबाला भेटण्यापासून रोखल्याने उत्तर प्रदेशमध्ये हुकुमशाही पद्धतीने काम केले जात असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे. या आदिवासींच्या हत्याकांडाला जबाबदार असणार्यांनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसेच कॉंग्रेसच्या महासचीव प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या प्रकाराचा निषेध करत योगी सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मान्यवरांनी त्यानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले.हिंगणघाट समुद्रपूर येथेही तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने घटनेचा निषध नोंदवण्यात आला असून यावेळी योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वर्ध्याच्या धरणे आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष सुधीर पांगुळ, महिला कांग्रेस अध्यक्ष हेमलता मेघे, वर्धा तालुका अध्यक्ष धैर्यशील जगताप, धर्मपाल ताकसांडे, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष पठाण, अल्पसंख्यक शहर उपाध्यक्ष सादिक शेख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. मिलिंद ठोंबरे , माजी सैनिक प्रवीण पेठे, पंससदस्य राजेश राजूरकर, देवळी पंचायत समितीचे सदस्य अशोक इंगळे, डॉ. बाळा माऊस्कर,ज्येष्ठ नेते बाबा अब्दुल जलिल, मनिष गंगमवार, प्रशांत देशमुख, एनएसयुआयचे समन्वयक गोविंद दिघीकर, प्रशांत झाडे, मिलिंद मोहोड, सतिश लांबट आदी सहभागी झाले होते.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion: