वर्धा - 9 वर्षाच्या चिमुकलीवर मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चिमुकली खेळत असताना नराधमाने तिला खाऊचे आमिष दाखवत मंदिरात नेले. इतकेच नव्हे तर गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चिमुकलीची प्रकृती बिघडल्याने हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. सुरेश कवडुजी गभणे (वय 50) असे आरोपीचे नाव आहे. आर्वी पोलीस आरोपीचा तपास करत आहेत.
चिमुकली ही आपल्या लहान भावासोबत मंदिर परिसरात नेहमी खेळायला जायची. सुरेश गभणे हा तिला नेहमी खाऊ चॉकलेट देत असे. घटनेच्या दिवशीही चिमुकली खेळायला जात असताना मंदिराच्या पायरीवरच बसलेल्या सुरेशने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिला बोलावले. यावेळी कोणीच नसल्याचे पाहून तिला मंदिरात आतमध्ये घेऊन गेला. यावेळी त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्याने गळा दाबून जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर पिडीत चिमुकली घरी गेली. तिने भीतीपोटी कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा - धुळ्यात वसतिगृहामध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण अस्पष्ट
सदर माहिती पीडित मुलीच्या वडिलांना देऊन तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशन आर्वी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुरेश गभणे याला माहिती मिळताच तो फरार झाला. शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.