वर्धा - शिक्षिकेबाबत झालेल्या घटनेचा आमदार समीर कुमावर यांनी निषेध केला. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे यासाठी मुख्यंत्र्यांनी येत्या काळात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आमदार समीर कुणावर यांनी केली आहे. या प्रकरणी मी स्वत: पोलीस उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांच्यासोबत जाऊन शाळेतील मुलींशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.
यासह या प्रकरणानंतर कठोर पाऊले उचलणे गरजेचे असल्याने यावर शहरातील शांतता सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार समीर कुणावर म्हणाले. जर का कुणी मुलींना आशा पद्धतीने त्रास देणे, मुलींचा पाठलाग करणे, संदेश पाठवणे, छेडछाड करणे असे प्रकार करत असतील तर मुलीने घाबरून न जाताच ती माहिती पोलिसांना आम्हाला द्यावी. अशा टवाळ खोरांना ताब्यात घेऊन त्यांच्या वाडीलाना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात येणार आहे. त्यांना पाहुणचार देऊन धडा शिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ही कुणावर म्हणाले.
या सारख्या घटना अचानक घडत नसून त्या मागे पार्श्वभूमी किंवा मोठ्या घटनेपूर्वी होणाऱ्या हालचाली लक्षात घेऊन पाऊले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून अश्या घटना टाळता येतील असेही ते म्हणाले. यावेळी आमदार समीर कुणावर यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे, शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.